Women Reservation Bill :ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर ट्विट करत त्यांची भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. मग पुन्हा एकदा प्रियंका यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा आणि आरक्षणाचा मुद्दा वेगळा करून महिलांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावर ट्विट केल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी सविस्तरपणे भूमिका मांडली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा वगळून महिलांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलीय, तर प्रियंका चतुर्वेदी यांच्या कालच्या ट्विटवरून सत्ताधा-यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर ट्विट करत त्यांची भूमिका मांडली होती, दरम्यान त्यानंतर त्यांच्या ट्विटचा दाखला देत सत्ताधा-यांनी विरोधकांवर टीका केली, मात्र यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी त्यांची भूमिका विशद केलीय. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं त्या म्हणाल्या आहेत, मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा आणि आरक्षणाचा मुद्दा वेगळा करून महिलांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलं होतं, दरम्यान या ट्विटनंतर सत्ताधा-यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केलीय. 'महिलांसाठी हा दु:खाचा दिवस' संसद किंवा विधानसभेत स्थान मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या भारतातील महिलांसाठी हा एक दुःखद दिवस आहे' असं शिवसेना UBT च्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हंटले होते.
दरम्यान प्रियंका चतुर्वेदी याच ट्विटवरून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केलीय. प्रियंका चतुर्वेदींनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आरसा दाखवला असं टीकास्त्र नवनाथ बन यांच्याकडून करण्यात आलं, तर चतुर्वेदी काय म्हणाल्यात त्याबाबत माहिती नाही अशी प्रतिक्रिया चतुर्वेदींच्या ट्विटवर संजय राऊतांनी दिलीय.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी तात्काळ ट्विट करत त्यांची भूमिका मांडली, मात्र आज त्यांनी त्यांची भूमिका सविस्तपरणे विशद केलीय. मतदारसंघ पुनर्रचनाचा मुद्दा वगळून फक्त महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विधेयक मांडण्याची मागणी त्यांनी केलीय. मात्र त्यांच्या आधीच्या ट्विटवरून सत्ताधा-यांनी मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय.