मुंबई : गेल्या वर्षभरापासून देशातचं नाही संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. माणसांनंतर आता प्राण्यांना देखील कोरोनाची लगाण होत असल्याचं समोर आलं. चेन्नईच्या एका बागेत 9 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नईतील अरिग्यार अन्ना जूलॉजिकल पार्कमधील नऊ सिंह कोरोना पॉझिटीव्ह आढळले. नऊ पैकी चार सिंहांची चाचणी जीनोम सिक्वेन्सींग भारतीय कृषी संशोधन परिषद - नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हाई सिक्योरिटी एनिमल डिसिजेस येथे करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपाळमध्ये करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेंसिंगच्या अहवालानुसार चार सिंह डेल्डा व्हॅरिएन्ट संक्रमित आहेत. अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, 'चार नमूने जीनोम सिक्वेंसिंग NIHSAD याठिकाणी पाठवण्यात आले होते. ' डेल्डा व्हेरिएन्ट सर्वप्रथम भारतात आढळला होता. आता डेल्टा व्हेरिएन्टने सर्वत्र थैमान घातलं आहे. 



सिंहामध्ये लक्षणं आढळल्याने पार्कने खबरदारी म्हणून 11 सिंहांची चाचणी केली. चाचणी केली असता 3 जून रोजी 9 सिंहांना कोरोना झाल्याचं लक्षात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण नीला नावाच्या नऊ वर्षाच्या सिंहाचा कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर मृत्यू झाला.