Vinod Shantilal Adani: देशातल्याच नाही तर जगभरातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अडानी समूहाचे (Adani Group) सर्वेसर्वा अर्थातच चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आयआयएफएल हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (IIFL Wealth Hurun India Rich List 2022) नुसार, गौतम अदानी एका दिवासाला तब्बल 1612 कोटी रुपये कमावतात. हुरुनद्वारे जाहीर केलेल्या यादीनुसार, गौतम अदानींचा भाऊ विनोद शांतिलाल अदानी हे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय (Non-Resident Indian) आहेत. चला तर मग जाणून घेऊयात विनोद शांतिलाल अदानी यांच्याबद्दल...


5 वर्षांमध्ये तब्बल 850% संपत्तीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानींचे भाऊ विनोद शांतिलाल अदानी हे दुबईमध्ये राहतात. दुबईबरोबरच (Dubai) ते जर्काता (Jakarta) आणि सिंगापूरमध्ये (Singapore) देखील अ‍ॅक्टिव्ह असतात. मागच्या वर्षी त्यांच्या संपत्तीमध्ये 37,400 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, विनोद शांतिलाल अदानी (Vinod Shantilal Adani) भारतील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहेत. याशिवाय, मागच्या पाच वर्षांत विनोद अदानींच्या संपत्तीमध्ये 850 टक्कयांनी वाढ झाली आहे. यामुळे त्यांची संपत्ती 1.69 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.


या दोन्ही भावांची संपत्ती एकत्र मोजली तर ती जवळपास 16.63 लाख कोटी रुपये होते. म्हणजे, हुरुन श्रीमंत्यांच्या टॉप 10 श्रीमंतांच्या संपत्तीपैका 40 ट्क्के संपत्ती या दोन भावंडांकडेच आहे. 


किती संपत्ती आहे?


IIFL Wealth Hurun India Rich List 2022 मध्ये एकुण 94 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ज्यामध्ये विनोद शांतिलाल अदानींनी प्रत्येक दिवशीच्या अनुशंगाने 102 कोटी रुपयांची संपत्तीची भर घालतात. तसेच, हिंदुजा ब्रदर्स (Hinduja Brothers)  1.65 लाख कोटी रुपयांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर, आर्सलर मित्तलसोबत (Arcelor Mittal) लक्ष्मी निवास मित्तल (Lakshmi Mittal) 1.5 लाख कोटा रुपयांच्या संपत्तीसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


कुठे राहतात विनोद शांतिलाल अदानी? 


विनोद शांतिलाल अदानी (Vinod Shantilal Adani) यांनी 1976 ला भिवाडीमध्ये वी आर टेक्सटाईल्स या कंपनीपासून पॉवर लूम सुरु करुन त्यांच्या प्रवाशाला सुरुवात केली. काही काळाने ते सिंगापूरला राहायला गेले. त्यानंतर ते पुन्हा 1994 ला दुबईमध्ये स्थायिक झाले आणि साखर, तेल, अ‍ॅल्यूमिनियम, कॉपर आणि आयरन स्क्रॅपच्या बिझनेसमध्ये वाढ केली.