गेमिंगमध्ये तिघींपैकी एक बहीण 'डेथ कमांडर'?; आवाज ऐकू येताच वडीलांची धाव... दार तोडून पाहिलं तर...

Ghaziabad Suicide Case : गाझियाबादमधील भारत सिटी इथं तीन बहिणींनी इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना 'कोरियन लव्हर' नावाच्या गेमच्या नादात घडल्याचं प्राथमिक तपासातून म्हटलं जात आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 4, 2026, 11:56 AM IST
गेमिंगमध्ये तिघींपैकी एक बहीण 'डेथ कमांडर'?; आवाज ऐकू येताच वडीलांची धाव... दार तोडून पाहिलं तर...
Ghaziabad Suicide Case crime news Bharat City Three Sisters Jump From 9th Floor bhuilding े

Ghaziabad Suicide Case : गाझियाबादमधील भारत सिटी नावाच्या वस्तीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आणि संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा ऑनलाईन गेमिंगचा मानवी जीवनाचा असणारा धोका अधिक गांभीर्यानं पुढे येताना दिसला. एका ऑनलाईन गेमच्याच नादात तीन बहिणींनी इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी आई- वडिलांसाठी एक पत्रवजा चिठ्ठी लिहिली. पोलीस यंत्रणेलाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील दृश्य पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. 

Add Zee News as a Preferred Source

सदर घटनेनंतर DCP निमिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली कोरियन संस्कृतीच्या आहारी गेल्या होत्या. प्राथमिक स्वरुपात त्यांच्या टास्क आणि गेमची माहिती मिळाली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईल वापरावर कुटुंबानं निर्बंध आणले होते. शिक्षणात फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या या मुली दोन वर्षांपासून शाळेत जात नव्हत्या. सध्या सदर प्रकरणी पुढील तपास सुरू असला तरीही या मुलींच्या पत्रात कोरियनं संस्कृतीचा उल्लेख आहे. 

मुलींच्या वडिलांनी काय घडलं ते सांगत म्हटलं...

मुलींच्या वडिलांनी घडल्या प्रकरणाबाबत माहिती देत सांगितल्यानुसार त्यांना सर्वप्रथम आलाड ऐकू आला. म्हणून ते खोलीपाशी गेले मात्र, खोली आतून बंद होती. त्यांनी दार तो़डून पुढे खाली पाहिलं तर तिथं एक मुलगी पडलेली दिसली. तिथूनच धाव मारत आपण खाली गेल्याचं सांगत तिथं तिन्ही मुली पडल्या होत्या असं मुलींच्या वडिलांनी सांगितलं. या मुली कोरियन गेम खेळत होत्या असं वडिलांनी सांगत आपल्याला त्या खेळाची पूर्ण कल्पना नसल्याचंही सांगितलं. कुटुंबीयांना आधी आपल्या मुली युट्यूब व्हिडीओ बनवतोय असं वाटलं. त्यापैकी एका मुलीच्या फोनमध्ये 50 दिवसांच्या 50 'टास्क'चे पुरावे मिळाले आहेत. या मुलींनी खिडकीतून उडी मारण्यासाठी शिडीचा वापर केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं. 

मधली बहीण या संपूर्ण गेममध्ये 'लीडर'

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास आत्महत्येच्याच प्रकरणाच्या अनुषंगानं करत असून या घटनेतील मृत मुलींचं वय निशिका 16 वर्षे, प्राची 14 वर्षे आणि पाखी 12 वर्षे होतं. या तिघींपैकी मधली बहीण या संपूर्ण गेममध्ये 'लीडर' होती असा पोलिसांचा अंदाज आहे. काय, कुठे आणि कसं करायचं आहे हे तिच ठरवत होती. तिन्ही बहिणी सर्व कामं एकत्र करायच्या. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार त्यांचं एकत्र असणं हासुद्धा या गेमचाच भाग असावा, ज्यामुळं विभक्त होण्याचा विचार हळुहळू दुरावत जातो. 

हेसुद्धा वाचा : बापरे! 'सॉरी मम्मी- पप्पा!' 12, 14, 16 वर्षांच्या तीन बहिणींनी इमारतीवरून रात्री एकाच वेळी मारली उडी; कारण...

या मुलींनी आपल्या देहबोलीतून कोणालाही संशय येऊ दिला नाही की त्या अशा कोणत्या गेमचा भाग आहेत. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार या मुली शांतच राहायच्या, बाहेर फारच क्वचित यायच्या. मात्र त्या असं काही करतील यावर शेजाऱ्यांचाही विश्वास बसला नाही. दरम्यान या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसांनी मुलींचे मोबाईल जप्त केले असून, आता त्यांच्या फोनची हिस्ट्री, सोशल मीडिया अकाऊंट, व्हिडीओ, App या साऱ्याबाबत डिजिटल फॉरेन्सिक टीम सर्व शक्य त्या मार्गांनी तपास करत असून, या मुली नेमका कोणता कंटेंट पाहत होत्या आणि त्यांच्यावर कोणा बाहेरच्या व्यक्तीचा प्रभाव होता का? या प्रश्नाचंही उत्तर शोधत आहेत. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More