Village of Bachelors In India: लग्न करताना मुली फक्त मुलांच्या स्वभावाती गुण-दोष नाहीतर त्याच्या कुटुंबांची आणि मुलगा कुठे राहतो, त्याचे घर कसं आहे. याचीही संपूर्ण चौकशी करतात. नंतरच लग्नाची चर्चा पुढे जाते. कधी कधी लग्न न करण्याची अनेक कारण असतात. मग तो मुलाचा किंवा मुलीचा स्वभाव असो किंवा घरातील परिस्थिती. पण तुम्ही कधी एकलंय का, की या गावातील मुलांना लग्नासाठी कोणी मुलगीच देत नाहीये. भारतात असं एक गाव आहे जिथे लग्नासाठी मुलांना कोणी मुलीच द्यायला तयार नाही. त्यामुळं या गावाचे नाव Village of Bachelors असं पडलं आहे. कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील जोंदालगट्टी असं या गावाचे नाव आहे.
केरळच्या जोंदालगट्टी गावातील मुलांसाठी लग्न करणे ही खूप मोठी समस्या असल्यासारखे वाटते. कारण मुली आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही या गावाशी नातं जोडण्यास तयार नाहीत. आता तुम्ही विचार करत असाल की गावात नेमकं असं काय आहे की, मुली त्या गावातील मुलांना लग्नासाठी नकार देतात. तर या मागे कारण आहे ते गावाचा न झालेला विकास.
या गावात आरोग्या सेवा, रस्ते, सुविधा आणि अन्य गरजेच्या व्यवस्था नाहीत. त्यामुळं लग्नासाठी कोणीही या गावात यायला तयार नाही. या गावात जवळपास 200 लोकांची लोकसंख्या आहे. तर, जवळपास 20 तरुण लग्नाचा प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही त्यांना कोणतीही मुलगी लग्नासाठी भेटली नाहीये.
गेल्या कित्येक वर्षांपासून या गावातील तरुणांची लग्नच होत नाहीयेत. त्याचा परिणाम या गावच्या भविष्यावर पडण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवातदेखील झाली आहे. कारण गावात मुलं जन्मच घेत नसल्याने शाळेत या वर्षी कोणीही नव्याने दाखल झालेले आहे. शाळेत फक्त 5 मुलं आहेत तर आंगणवाडी ओस पडलेली आहे.
एका रिपोर्टनुसार, जोंदालगट्टी गावात सर्वाधीक मराठा समाजाचे लोक राहतात. यातील 41 घरांपैकी 31 कुटुंब मराठा समाजाचे आहेत. तर, ओबीसी समाजातील ही काही घरे आहेत. लग्नाच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील काही तरुणांनी अलीकडेच आमदार यासिर अहमद पठाण यांच्या जनसंवाद बैठकीत चिंता व्यक्त केली होती.
एका रिपोर्टनुसार, आमदारांसोबत झालेल्या भेटीदरम्यान, गावकऱ्यांनी सांगितले की, गावातून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी जंगलातून जावे लागते. जरी काही दिवसांपूर्वी तिथे बस सेवा सुरू झाली असली तरी ती फक्त सकाळीच उपलब्ध असते आणि संध्याकाळी परत येते. गावातील तरुणांची आर्थिक स्थिती चांगली असली तरी गावाची वाईट परिस्थिती पाहून मुली लग्न करण्यास नकार देतात.