'असा आदेश देऊ, आयुष्यभर विसरणार नाही!' सुप्रीम कोर्टाने अख्ख्या राज्याच्या पोलीस दलाला का झापलं?

Supreme Court On Police : असा आदेश देऊ, आयुष्यभर विसरणार नाही; एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारलंय. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊयात. 

नेहा चौधरी | Updated: Nov 29, 2024, 02:25 PM IST
'असा आदेश देऊ, आयुष्यभर विसरणार नाही!' सुप्रीम कोर्टाने अख्ख्या राज्याच्या पोलीस दलाला का झापलं?

Supreme Court On UP Police : एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना कडक शब्दांमध्ये फटकारलंय. गँगस्टर अनुराग दुबे उर्फ ​​डब्बनच्या अटकपूर्वी जामिनीवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय पोलिसांवर संतापले. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांना खडेबोल ऐक म्हणाले की, 'तुम्ही सत्तेचा आनंद घेत आहात. तुम्हाला संवेदनशील असणे आवश्यक आहे.' न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असून हे प्रकरण उत्तर प्रदेशातील फारुखाबादमधील आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सर्वोच्च न्यायालय पोलिसांवर संतापले!

अनुराग दुबेच्या अटकेला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, 'न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही नव्या किंवा जुन्या प्रकरणात त्याला अटक केली जाणार नाही. तुमच्या डीजीपीला सांगा की, त्याला (अनुराग दुबे) हात लावला तर लक्षात ठेवा, असा कडक आदेश देईल, या शब्दात फटकारलं. 

नेमकं काय प्रकरण ?

सर्वोच्च न्यायालयात अनुराग दुबे यांनी त्यांच्यावरील लावण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात गेल्या सुनावणीदरम्यान हा खटला रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. दुबे तपासात सहकार्य करेल या अटीवर अटकेवर अंतरिम स्थगिती देऊन अटकपूर्व जामिनावर स्थगिती दिली होती. मात्र गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ वकील राणा मुखर्जी यांनी सांगितलं की, आरोपी (अनुराग दुबे) तपासात सहकार्य करत नाही. तो दिसला नाही.

पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

याबाबत न्यायालयाने दुबे यांचे वकील अभिषेक चौधरी यांना विचारले असता त्यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र पोलिसांना पाठवले असल्याचे सांगितलंय. त्यात मोबाईल क्रमांकही दिला आहे. मात्र पोलीस अटक करतील या भीतीने तो गेला नाही, असा युक्तिवाद दुबेचा वकिलाने न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत तुम्ही किती गुन्हे दाखल करणार असा सवाल उपस्थितीत केला. हा तर जमिनीचा वाद आहे. 

जमीन बळकावल्याचा आरोप करणे खूप सोपे आहे. तुम्ही प्रत्येक वेळी नवीन केस दाखल करत आहात. न्यायालयाच्या टिप्पण्यांवर राणा मुखर्जी म्हणाले की, जर याचिकाकर्ता हजर झाला तर त्याला अटक केली जाणार नाही, असे आश्वासन मी न्यायालयाला देतो. तसे झाल्यास ते प्रकरण राज्य सरकारकडे परत करतील.'

न्यायालयाने म्हटलंय की, न्यायालयीन अधिकारी म्हणून त्यांची अनेक वर्षांपासून ओळख आहे. पोलिसांनी संवेदनशील कसे व्हावे हा येथे मुद्दा आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमचे पोलीस धोकादायक क्षेत्रात दाखल झाले आहेत. तुम्ही तुमच्या डीजीपीला सांगू शकता की जर त्याला हात लावला तर ते असा आदेश देईल की त्यांना आयुष्यात लक्षात राहील.

यानंतर न्यायालयाने आदेशात लिहिलं की, याचिकाकर्त्याने पोलिसांना मोबाईल क्रमांक आधीच दिला होता. त्याचा नंबर 24 तास सक्रिय राहील. तपास अधिकारी त्या क्रमांकावर माहिती देतील आणि तपासात सहभागी होण्यास सांगतील. याचिकाकर्ता मोबाईलवर मिळालेल्या नोटीसचे पालन करेल. याचिकाकर्त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाणार नाही. 

 

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More