GK Quiz: असा कोणता प्राणी आहे जो हृदयाशिवाय जगतो? जाणून घ्या उत्तर

General Knowledge Quiz: क्विझमधील प्रश्नांमध्ये संपूर्ण जगाची माहिती दडलेली असते. आजकाल ट्रेंडिंग क्विझने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. या प्रश्नांच्या मदतीने लोक त्यांचे सामान्य ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्विझ हा एक ऊत्तम उपयुक्त मार्ग आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 20, 2025, 10:14 AM IST
GK Quiz: असा कोणता प्राणी आहे जो हृदयाशिवाय जगतो? जाणून घ्या उत्तर

Indian Quiz: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एखाद्या क्विझमधील प्रश्न वरदानापेक्षा कमी नाहीत. प्रश्नमंजुषा आणि इंटरनेटच्या मदतीने अभ्यासाची पद्धत झपाट्याने बदलत आहे. आजकाल मुले क्विझमधील प्रश्नांमध्ये खूप रस दाखवत आहेत. जवळपास प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाचा एक महत्त्वाचा पेपर असतो, ज्यामध्ये जगाशी संबंधित विविध प्रश्न विचारले जातात. आम्ही तुमच्यासाठी असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेऊन आलो आहोत, जे तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरू शकतात.

प्रश्न 1 - अशी कोणती वस्तू आहे जी आयुष्यात दोनदा फुकट दिली जाते, पण तिसऱ्यांदा नाही?

उत्तर- ही  गोष्ट म्हणजे दात. लहानपणी दुधाचे दात आणि नंतर कायमचे दात फुकट मिळतात, पण तेही गळून पडले तर तिसऱ्यांदा पैसे खर्च करावे लागतात, म्हणजे कृत्रिम दात बसवावे लागतात.

प्रश्न २- भारताचे क्षेत्रफळ पाकिस्तानपेक्षा किती मोठे आहे ते सांगा?

उत्तर-  भारताचे क्षेत्रफळ पाकिस्तानच्या 4 पटीने जास्त आहे. म्हणजे भूभागाच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा चौपट मोठा आहे.

प्रश्न 3 - "स्लमडॉग मिलेनियर" हा पुरस्कार विजेता चित्रपट खालीलपैकी कोणत्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे?

उत्तर-  डॅनी बोयल

प्रश्न 4 - दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्रपतींना 2000 सालासाठी गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

उत्तर- ग्रामीण बँक ऑफ बांगलादेश

प्रश्न 5-  असा कोणता प्राणी आहे जो हृदयाशिवाय जगतो?

उत्तर- ॲनिमोन कोरल हा प्राणी आहे जो हृदयाशिवाय जगतो. जेलीफिश सारखा सागरी प्राणी आहे, ज्याला मेंदू नाही, पण तो आपल्या मज्जासंस्थेच्या मदतीने शरीरावर नियंत्रण ठेवतो. त्यांचे शरीर रंगीबेरंगी असून त्यांना मत्स्यालयातही ठेवण्यात आले आहे. ॲनिमोन कोरल त्यांच्या शिकारीवर त्यांच्या विषारी डंकाने हल्ला करतात, जे अत्यंत धोकादायक असू शकतात. त्यांच्या डंकमुळे तीव्र वेदना होतात आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होऊ शकतो.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)