Man Arrested from train Sexual Assault: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये मंगळवारी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी एक धक्कादायक प्रकार घडला. धावत्या ट्रेनमधून एका 44 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीने धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये 22 वर्षीय महिला प्रवाशाबरोबर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केरळमधून ही तरुणी तिच्या काही मित्रमैत्रीणींबरोबर गोव्याला परत येत असताना तिच्याबरोबर हा प्रकार घडला. 


पुर्णा एक्सप्रेसमधील घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पुर्णा एक्सप्रेसमध्ये ही तरुणी तिच्या लोअर बर्थवरील सीटवर झोपलेली असताना ही व्यक्ती तिच्या चेहऱ्याजवळ जाऊन पॅण्टची चैन उघडत असल्याचं तरुणीबरोबरच्या 2 मित्रांनी पाहिलं. कर्नाटकमधील गोकर्ण रेल्वे स्थानकामध्ये एक्सप्रेस पोहचली तेव्हा हा प्रकार घडला. या तरुणांनी तातडीने आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कोकण रेल्वे पोलिसांना अलर्ट केलं. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


नक्की घडलं काय?


पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, हा सारा प्रकार सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. कोकण रेल्वे पोलिसांच्या तुकडीत कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक सुनिल गुडलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी झोपलेली असतानाच आरोपी तिच्या जवळ गेला आणि तो तिच्या चेहऱ्यावर हस्तमैथून करु लागला. या तरुणीच्या मित्रांनी प्रसंगावधान दाखवत आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने दखल घेत या आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित तरुणीचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने यापूर्वीही असे काही प्रकार केले आहेत का? यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत.


यापूर्वीही घडला असा प्रकार


डिसेंबर महिन्यामध्ये चेन्नईमध्ये अशाच प्रकारची एक विचित्र घटना घडली होती. या ठिकाणी मुलींच्या कॉलेजबाहेरील गेटजवळ एका व्यक्तीने कॉलेजमधून बाहेर पडत असलेल्या विद्यार्थिनींना पाहून अंगावरील सर्व कपडे काढले. याची माहिती विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाला दिली. कॉलेजने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे आरोपीला अटक केली. मागील वर्षी एअर इंडिया विमानामध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांनी महिला सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झालेला. या प्रकरणी कारवाई करताना एअर इंडियाने दोषी आरोपीवर 4 महिन्यांची उड्डाण बंदी घातली होती.