Goa News : गोवा... (Goa travel plan) अनेकांसाठी हे राज्य म्हणजे आवडीचं ठिकाण. अनोळखी माणसं, अनोळखी वातावरण आणि शांतता. काहींसाठी गोवा म्हणजे (Goa Party) पार्टी हब, तर काहींसाठी गोवा म्हणजे एक नवा अनुभव. पण, हेच गोवा एका कुटुंबासाठी कटू आठवणी देऊन गेलं आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु असून, पर्यटकांसोबत असे प्रकार घडणार असतील तर, गोव्यात जायचं की नाही? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. कारण, इथं काही पर्यटकांवर स्थानिकांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीसुद्धा गोव्यात घडलेल्या या प्रकरणाची दखल घेत त्याबाबत कठोर कारवाई केली जाणार असल्याचा शब्द दिला आहे. गोव्यातील (Anjuna) अंजुना येथे असणाऱ्या Spazio Leisure resort मध्ये हा प्रकार घडला. ज्याप्रकरणी आता तीन व्यक्तिंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


गोव्यात नेमकं काय घडलं? 


जतिन शर्मा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ते गोव्याच्या सफरीवर गेले होते. त्याचवेळी त्यांच्यासह त्यांच्या कुटचुंबावर Royston Dias, Nyron Dias आणि Kashinath Agarwadekar नावाच्या व्यक्तींनी अंजुनातील हॉटेलबाहेर हल्ला केला. सोशल मीडियावर शर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर अतिशय निर्दयीपणे वार केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील किंकाळ्या आणि इतर दृश्य मन विचलित करत आहेत. (दृश्य अती विचलित करणारी असल्यामुळं इथं व्हिडीओ जोडण्यात आलेला नाही.)


हेसुद्धा वाचा : VIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद


शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील कर्मचाऱ्यांबद्दल मॅनेजरकडे तक्रार केल्यानंतर त्यानं कर्मचाऱ्यांना रागे भरलं आणि त्यानंतरच ही घटना घडली. सूडाच्या भावनेनं कर्मचाऱ्यांनी त्यांच्या काही मित्रांना बोलवलं आणि या कुटुंबावर हॉटेलबाहेर हल्ला करण्यात आला. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात उडी घेत आरोपींवर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला. 




मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत... 


दरम्यान, घडलेला सर्व प्रकार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी घडलेली घटना धक्कादायक असून, हे असे प्रकार अजिबातच सहन केले जाणार नसल्याचं म्हणत आपण पोलिसांना कठोरातील कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचं सांगितलं. अशा असामाजिक घटकांचा समाजाला आणि राज्यालाही धोका असल्याचं म्हणत त्यांना धडा शिकवलाच गेला पाहिले असा सूर त्यांनी आळवला. 


गोव्यात घडलेला हा प्रकार पाहता सध्याच्या घडीला या राज्यात सुट्टीसाठी जाणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.