Gold and silver Price : MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा हा 47,000 च्याही खाली आहे. मागील आठवड्यामध्ये सोन्याच्या वायदा किंमतींमध्ये सातत्यानं घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सोबतच या दरांमध्ये मागील काही काळापासून चढ- उतार दिसून येत आहे. ज्यामुळं आता सोनं खरेदी करणाऱ्यांनी एकच घाईही करण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये असणारी अनिश्चितता पाहता दर कमी फरकानं कमी झाले, तरीही खरेदी करणाऱ्यांचा आकडा मात्र मोठाच असल्याचं पाहायला मिळतं. 


यावेळी आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सोन्याचे दर जवळपास 46946 रुपांवर स्थिरावले होते. ज्यानंतर मंगळवारी हे दर 46924 रुपयांवर पोहोचले. अर्थात यामध्ये 22 रुपयांची घट झाली. 


चांदीच्या दरांमध्येही अशीच घट दिसून आली. सोमवारी चांदी प्रती किलो 63299 रुपयांवर स्थिरावली. तर मंगळवारी हे दर 96 रुपयांनी कमी होऊन 63203 वर पोहोचले. 


मोठ्या फरकानं सोनं आणि चांदीच्या दरांत कपात झालेली नसली तरीही मागील काळापासून सोन्याचे दर तब्बल 9 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रती तोळा इतक्या दरावर पोहोचलं होतं. त्यामुळं आताचे आकडे आणि घट झालेले दर पाहता यामध्ये मोठा फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. परिणामी सोनं खरेदीसाठी अनेकांचेच पाय वळत आहेत. 


देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर (प्रती तोळा)
मुंबई - 46000
नागपूर- 46000
दिल्ली - 46140
बंगळुरू- 43990
चेन्नई- 44350