Gold Rate Today: सोन्याच्या दरात 12 डिसेंबर रोजी तेजी दिसून आली होती. मात्र आज पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरामुळंही सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने त्यांचे प्रमुख व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केल्यानंतर सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. प्रमुख व्याजदरांमध्ये घट झाल्यामुळे बाँड उत्पन्न कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवणूक वाढवू शकतील. देशातील काही प्रमुख शहरांमधील सध्याचे सोन्याचे दर जाणून घ्या. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदरात 0.25 टक्के कपात केल्यानंतर सोने आणि चांदीमधील गुंतवणूक वाढली आहे. प्रमुख व्याजदरांमध्ये घट झाल्यामुळे बाँड उत्पन्न कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढवतील.
13 डिसेंबर रोजी चांदीच्या किमतीतही वाढ झाली. किंमत प्रति किलोग्रॅम 2,04,100 रुपयांवर पोहोचली. एक दिवस आधी, चांदीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. परदेशी बाजारात चांदीची स्पॉट किंमत प्रति औंस $64.57 आहे. जागतिक पुरवठ्यातील कमतरता, चीनकडून सततची मागणी आणि वाढत्या औद्योगिक वापरामुळे, या वर्षी परताव्याच्या बाबतीत चांदीने सोन्यापेक्षा जास्त कामगिरी केली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,33,910 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली असून 1,22,750 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,00,430 रुपयांवर पोहोचलं आहे.
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,22,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,33,910 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,00,430 रुपये
1 ग्रॅम 22 कॅरेट 12,275 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,391 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 10,043 रुपये
8 ग्रॅम 22 कॅरेट 98,200 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,07,128 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 80,344 रुपये
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,22,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,33,910 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 1,00,430 रुपये
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.