सोनं 35 टक्क्यांनी स्वस्त होणार, चांदी थेट 77 हजारांवर येणार? लक्ष्मीपूजनाला सोनं खरेदी स्वस्त होणार का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Gold Price Prediction: येत्या काळात सोन्याच्या किंमती लवकरच कमी होऊ शकतात. त्याचा बाजारपेठेवर काय परिणाम होईल. वाचा सर्वकाही

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 16, 2025, 02:55 PM IST
सोनं 35 टक्क्यांनी स्वस्त होणार, चांदी थेट 77 हजारांवर येणार? लक्ष्मीपूजनाला सोनं खरेदी स्वस्त होणार का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Gold And Silver Prices Set To Drop Soon 22 carat rates

Gold Price Prediction: दिवाळीआधीच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. मौल्यवान धातुचे दर गगनाला भिडले आहेत. एका वर्षातच तब्बल 61 टक्के भाव वाढला आहे. ज्यामुळं शेअर, बाँड आणि अन्य गुंतवणुकीच्या साधनात्या तुलनेत सर्वाधिक रिटर्न देणारा पर्याय म्हणून समोर आला आहे. पण तज्ज्ञाच्या मते लवकरच सोनं स्वस्त होणार आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. अशावेळी सोनं विकावं की ठेवावे असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

लवकरच सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्याचे दर लाखाच्या वर पोहोचले आहेत. मात्र हे दर 70 हजारांच्या आसपास घसरू शकतात. सध्या राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता, डॉलरची घसरण यासर्व कारणांमुळं सोनं महागले आहे. स्पॉट गोल्डने आत्तापर्यंतचा सर्वाधीक 4,225.69 डॉलर प्रति औंसवर  पोहोचले होते. आणि पुन्हा 0.4 टक्क्यांनी वाढून 4,224.79 डॉलरवर पोहोचले होते. 

जेव्हा पण आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चिततेचे सावट असते. तेव्हा गुंतवणुकदार सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्यात गुंतवणुक करतात. सोन्याच्या किंमत यावर्षी 4,400 डॉलर प्रति औंसवर पोहोचू शकते. तर, 2026च्या जूनपर्यंत 4,600 डॉलरच्या आसपास जाऊ शकते. मात्र त्यानंतर मात्र सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते.

ANZ अहवालानुसार, राजकीय अस्थिरता, टॅरिफ विवाद आणि भू-राजकीय तणाव यासारखे घटक गुंतवणूकदारांना सोन्याकडे आकर्षित करत राहतील. अहवालात असा अंदाज आहे की 2026 च्या मध्यापर्यंत चांदीचे भाव प्रति औंस 57.50 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. मात्र, जर यूएस फेडरल रिझर्व्हने आपला पवित्रा कडक केला किंवा यूएस अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली तर उलट परिणाम होऊ शकतो आणि सोन्याच्या किमती घसरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्क्यांनी घसरु शकतात. म्हणजेच साधारणतः 77,701 पर्यंत सोन्याच्या किंमतीत घसरण होऊ शकते. तर, चांदीच्या किंमतीत 50 टक्क्यांची घट होऊन चांदी प्रतिकिलो 77,450 रुपयांवर पोहोचू शकते. 

FAQ

प्रश्न १: दिवाळीआधी सोन्याच्या किंमतीची सध्याची स्थिती काय?

उत्तर: दिवाळीआधी सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला असून, एका वर्षात ६१% वाढ झाली आहे. सध्या स्पॉट गोल्ड ४,२२४.७९ डॉलर प्रति औंसवर आहे, ज्यामुळे लाखाच्या वर पोहोचले आहे. हे शेअर, बॉंड यांपेक्षा सर्वोत्तम रिटर्न देणारे ठरले आहे.

प्रश्न २: २०२५ आणि २०२६ साठी सोन्याच्या किंमतीचे अंदाज काय?

उत्तर: २०२५ अखेरीस ४,४०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. २०२६ च्या जूनपर्यंत ४,६०० डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते, तर वर्षअखेरीस ५,००० डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर घसरण होण्याची शक्यता आहे.

प्रश्न ३: सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याचे कारण काय?

उत्तर: राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरची घसरण यामुळे सध्या सोनं महागले आहे. मात्र, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कडक केले किंवा यूएस अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली तर ३०-३५% घसरण होऊ शकते, म्हणजे ७७,७०१ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More