महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का; आज सोनं-चांदी महागली, वाचा तोळ्याचा भाव

Gold Rate Today 1st Dec 2025: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2025, 11:47 AM IST
महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का; आज सोनं-चांदी महागली, वाचा तोळ्याचा भाव
gold and silver prices surge on december 1 2025 18k 22k 24K price check

Gold Rate Today 1st Dec 2025: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आज 600 रुपयांनी सोनं वधारलं आहे. तर चांदीच्या दरातही साधारण 3000 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. देशात सोनं-चांदीच्या दरात किती वाढ झाली आणि आजचे दर काय जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याज दरात कपात होण्याची शक्यता असतानाच सोनं पुन्हा एकदा वधारलं आहे. गुंतवणुकदारांनी सोन्यात दाखवलेली रुची आणि जगभरातून मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळंही सोन्याच्या दरात वाढ नोंदवली आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांची वाढ झाली असून 1,30,480 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोनं 1,19,600 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची वाढ झाली असून 97,860 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. 

आजचा सोन्याचा भाव काय?

- 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,860 रुपये

- 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,960 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 13,048 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,786 रुपये

- 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 95,680 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,384 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 78,288 रुपये

- मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,19,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,30,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 97,860 रुपये

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More