'अब की बार सोनं एक लाख पार'! ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, वाचा आजचे भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 21, 2025, 10:43 AM IST
 'अब की बार सोनं एक लाख पार'!  ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, वाचा आजचे भाव

Gold Price Today: सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून आज 21 एप्रिल रोजी सोनं एक लाखांवर जाऊन पोहोचलं आहे. भारतात कमोडिटी एक्सचेंजनुसार गोल्ड फ्युचर्स सुरुवातीला 1196 रुपयांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी उसळले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,450 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर जीएसटीसह सोनं शुद्ध सोने जीएसटीसह 101000 रुपये (एक लाख एक हजार रुपये) प्रति तोळावर पोहोचले आहे. सोन्याच्या दराने आज पुन्हा उच्चांक गाठला आहे. 

सोनं एक लाखाच्या पार गेल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. येत्या काहि दिवसांतच अक्षय्यतृतीयेचा सण आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. मात्र त्याआधीच सोन्याने उच्चांकी दर गाठले आहेत. तसंच, एप्रिल-मे महिन्यापासून लग्नसराईला सुरूवात होते. ऐन मुहूर्तावरच सोनं महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस गोल्ड फ्यूचर्स 2 टक्क्यांच्या तेजीसह 3,396 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आह. अमेरिकेच्या डॉलरमध्ये होत असलेली घसरण यामुळं दुसऱ्या चलनाद्वारे सोनं खरेदी करणं स्वस्त होतं. त्यामुळं डॉलरच्या घसरणीचा थेट फायदा सोन्याच्या किंमतीवर पडत असल्याचे समोर आले आहे. 

सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं आज 770 रुपयांनी वधारून 98,350 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोनं 90,150 रुपयांवर पोहोचलं असून 18 कॅरेट सोनं 73.760 रुपयांवर पोहोचलं आहे. 

काय आहेत सोन्याचे दर!

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  90,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 98,350 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  73,760 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट  9,015 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,835 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    7,376 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   72,120 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट 78,680 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,008  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 90,150 रुपये
24 कॅरेट- 98,350 रुपये
18 कॅरेट- 73,760 रुपये