Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. वायदे बाजारात गुरूवारी मौल्यवान धातुच्या दरांत पुन्हा एकदा उसळी दिसून आली आहे. तर, एकीकडे सराफा बाजारात घसरण थांबली आहे. वायदे बाजारात सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ दिसत आहे. MCX वर आज भाव 88,000 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 3,040 डॉलरच्या जवळपास आहे. अमेरिकेत ट्रेड पॉलिसीमध्ये असलेली अनिश्चिततेमुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
डॉनल्ड ट्रंप यांनी आयात शुल्कांची घोषणा केली आहे. 2 एप्रिलपासून हे शुल्क लागू होणार आहेत. तर गोल्ड स्पॉट प्राइसमध्ये या वर्षी 16 टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. MCX वर चांदी जवळपास 350 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास ग्लोबल मार्केटमध्ये $34 ने चांदीचा भाव पार केला आहे. 1 महिन्यात चांदी 6 टक्क्यांनी महागली आहे. या वर्षी चांदीचा जवळपास 14 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे.
MCX वर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोल्ड फ्युचर 460 रुपयांच्या तेजीने 88,098 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करतोय. काल सोन्याचा भाव 87,638 रुपयांवर स्थिरावला होता. या दरम्यान चांदी 364 रुपयांच्या तेजीसह 99,850 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावत आहे. काल चांदी 99,486 रुपयांवर स्थिरावली आहे.
सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचे दर 440 रुपयांनी वाढले आहेत. आज 10 ग्रॅम सोनं 89,840 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 82,350 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 67,380 रुपयांवर पोहोचलं आहे. गुढीपाडव्याचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.