Gold Rate History In India: सोनं खरेदी म्हटलं की सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठीच आवडीची गोष्ट...मात्र ही सोनं खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलीये. सोनं 1 लाख पार होईल असं म्हणता म्हणात सोन्याने 1 लाखाचा टप्पा गाठला आहे. अक्षय्य तृतीया आणि लग्न सराईत सोन्याला विक्री दर आला आहे. त्यामुळे आता सोने खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेल्याचे दिसत आहे. सोनं दरवाढीची मागील काही वर्षांचा इतिहासा पाहिला असता एक काळ असा होता की सोन्याचा दर 10 हजार रुपये तोळा होता. जाणून घेऊया सोन्याच्या दरात कोणत्या वर्षी किती वाढ झाली?
सोन्याचे दर कधी कमी होणार याची सर्वसामान्य ग्राहक आतुरतेने वाट पाहतात. मात्र सोन्याने पार केलेल्या 1 लाखाच्या टप्प्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झालाय. आता या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर आणखी किती वाढतायत याकडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत.
2007 पासून 2025 ची आकडेवारी पाहिली असता सोन्याच्या दरात वर्षाला सरासरी 2 ते 3 हजारांची वाढ झाली आहे. 2007 मध्ये 10 हजार रुपये प्रति तोळा असलेल्या सोन्याच्या दराने लाखाचा आकडा पार केला आहे.
वर्ष 2007 - 10,800 प्रति तोळा
वर्ष 2008 - 12,500 प्रति तोळा
वर्ष 2009 - 14,500 प्रति तोळा
वर्ष 2010 - 18,500 प्रति तोळा
वर्ष 2011 - 26,400 प्रति तोळा
वर्ष 2012 - 31,050 प्रति तोळा
वर्ष 2013 - 29,600 प्रति तोळा
वर्ष 2014 - 28,007 प्रति तोळा
वर्ष 2015 - 26,344 प्रति तोळा
वर्ष 2016 - 28,624 प्रति तोळा
वर्ष 2017 - 29,668 प्रति तोळा
वर्ष 2018 - 31,438 प्रति तोळा
वर्ष 2019 - 35,220 प्रति तोळा
वर्ष 2020 - 48,651 प्रति तोळा
वर्ष 2021 - 48,720 प्रति तोळा
वर्ष 2022 - 52,670 प्रति तोळा
वर्ष 2023 - 65,330 प्रति तोळा
वर्ष 2024 - 77,560 प्रति तोळा
वर्ष 2025 - 1,00,000 प्रति तोळा