आजच खरेदी करा सोनं दिवाळीनंतर आवाक्याबाहेर जाणार दर

वर्षभरात सोनं 8300 रुपयांनी स्वस्त झालं

Updated: Jul 21, 2021, 05:53 PM IST
आजच खरेदी करा सोनं दिवाळीनंतर आवाक्याबाहेर जाणार दर

मुंबई: बकरी ईद निमित्तानं जरी आज MCXवर ट्रेडिंग बंद असलं तरी सराफ बाजारात मात्र सोनं-चांदीची खरेदी सुरू आहे. मंगळवारी 10 ग्रॅम सोन्यासाठी 48 हजार 295 रुपये मोजावे लागले. तर मार्केट बंद होत असताना हे दर उतरले असून 47 हजार 771 रुपये सोन्याची किंमत झाली. गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर साधारण 47 ते 48 हजारात राहिले आहेत. 

सध्या सोन्यात गुंतवणूक करायचा विचार असेल किंवा तुम्ही सोनं उतरण्याची वाट पाहात असाल तर ती चूक करू नका. कारण सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आणि वाढण्याची अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किंमत दिवाळीपर्यंत आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात गुंतवणूक करणं किंवा सोन्याची खरेदी करणं फायद्याचं राहू शकतं. 

12 ते 20 जुलै दरम्यान कसे होते सोन्याचे दर (MCX )

12 जुलै सोमवार - 47 हजार 774/10 ग्रॅम
13 जुलै मंगलवार - 47 हजार 889/10 ग्रॅम
14 जुलै बुधवार-  48 हजार 299/10 ग्रॅम
15 जुलै गुरुवार- 48 हजार 400/10 ग्रॅम 
16 जुलै शुक्रवार- 48 हजार 053/10 ग्रॅम
19 जुलै सोमवार-  48 हजार 094/10 ग्रॅम             
20 जुलै मंगलवार- 47 हजार 876/10ग्रॅम         

कोरोनाच्या संकटात लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ऑगस्ट 2020मध्ये सोन्याचे दर 56 हजार 191 रुपयांपर्यंत पोहोचले होते. वर्षभरात सोनं 8300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. येत्या काळात या सोन्याला पुन्हा झळाळी मिळेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हे सोन्याचे दर दिवळीपर्यंत 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.