आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा उलटफेर, स्वस्त झालं की महाग? वाचा 18k, 22K, 24K चे भाव

Gold Rate Today In Marathi: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घेऊयात. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 15, 2025, 12:31 PM IST
आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा उलटफेर, स्वस्त झालं की महाग? वाचा 18k, 22K, 24K चे भाव
Gold Rate Today 15 April 2025 Check 18k, 22K, 24K Gold Price in Mumbai

Gold Rate Today In Marathi: भारतात सोनं हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भारतीय कुटुंब व्यवस्थेत लग्नासाठी सोनं करून ठेवणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. गेल्या कित्येक पिढीपासून ही प्रथा सुरू आहे. अनेक कटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही सोन्याचे दागिने आणि सोन्याचे शिक्के देण्याची परंपरा आहे. आर्थिक अनिश्चित्तता आणि सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोनं हा सुरक्षित पर्याय मानला जातो. सध्या जगावर अनिश्चिततेचं सावट आहे. जगात अनेक ठिकाणी आर्थिक युद्ध आणि जागतिक मंदीची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. अनेक मोठ्या शहरांत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. जर तुम्हीदेखील सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर जाणून घ्या आजचे दर काय आहेत. 

एका अहवालानुसार, सोनं या वर्षाअखेर 1.30 लाखांचा आकडा पार करु शकतो. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आर्थिक मंदीचा फटका बसू नये यासाठी सोन्याच्या मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या दरात होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीने उच्चांकी दर गाठला आहे. त्यामुळं त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरदेखील होताना दिसत आहे. 

सोन्याच्या किंमती का वाढताहेत?

मंदीचा धोका, वाढत्या रोखे उत्पन्न आणि आर्थिक अस्थिरतेबद्दलच्या चिंता या कारणांमुळं गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित करत आहेत. वैयक्तिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, संस्था आणि मध्यवर्ती बँकांकडूनही सोन्याची मागणी वाढत आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2020 नंतर सोन्यावर आधारित एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली. केंद्रीय बँका, विशेषतः उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात अधिक सोने खरेदी करत आहेत.

मुंबईत आज काय आहेत सोन्याचे दर?

मुंबईत काल 18 कॅरेट सोन्याचे दर 7,164 प्रति ग्रॅम होती तर आज प्रतिग्रॅम 7,135 रुपयांवर पोहोचली आहे. प्रतितोळा सोनं  71,470 रुपयांवर पोहोचलं आहे.

22 कॅरेट सोन्याची किंमत काल 8,755 रुपये प्रति ग्रॅम होती. तर आज मुंबईच्या बाजारपेठेत 8,720 रुपये प्रतिग्रॅम आहे. तर प्रतितोळा 87,350 रुपयांवर 22 कॅरेट सोन्याची किंमत आहे. 

24 कॅरेट सोन्याची किंमत काल प्रतिग्रॅम 9,566 रुपये होती. तर, आज प्रतिग्रॅम 9,533 रुपयांवर पोहोचले आहे. प्रतितोळा सोनं 95,330 रुपयांवर पोहोचले आहे.