Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा सोनं महागलं आहे. सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर, एकीकडे चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चांदी 84 रुपयांनी घसरून ₹1,01,185 वर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
सोन्याच्या किंमतीत सातत्याने दरवाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 35 डॉलरने वाढून 3,040 डॉलर प्रति औंसच्या नवीन रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. सराफा बाजारातदेखील सोन्याचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहेत. आज सोन्याचे दर 90 हजारांच्या वर पोहोचले आहेत. जाणून घेऊयात आजचे सोन्याचे दर
आज सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 90 हजारांवर पोहोचले आहेत. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 82,900 रुपयांवर पोहोचली आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची वाढ झाली असून 90,440 रुपयांवर पोहोचली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांवर पोहोचली आहे त्यामुळं 10 ग्रॅम सोनं 67,830 रुपयांवर पोहोचले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 82,900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 90,440 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 67,830 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,290 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,044 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,783 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 66, 320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 72,352 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 54,264 रुपये
22 कॅरेट- 82,900 रुपये
24 कॅरेट- 90,440 रुपये
18 कॅरेट- 67,830 रुपये