Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज सोन्याचे दर वाढले आहेत. कमोडिटी बाजारात काही दिवसांपासून मोठी उलटफेर होताना दिसत आहे. गोल्ड 754 अंकांनी वाढून93195 वर पोहोचले आहे. तर चांदीचीदेखील हिच परिस्थीती आहे. चांदी MCXवर 292 अंकाच्या तेजीसोबत 95610 वर व्यवहार करताना दिसत आहे. तर देशांतर्गंत बाजारात सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली होती. मात्र अचानक आज बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे.
कमोडिटी बाजाराबाबत बोलायचे झाल्यास शुक्रवारी घसरण झाल्यानंतर आज सोनं 60 डॉलरने उसळून 3250 डॉलरच्या आसपास पोहोचले होते. तर, चांदीच्या दरातही हलकी वाढ होऊन 33 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 2,300 रुपयांपर्यंत घसरले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट पाहायला मिळाली होती.
आज 22 कॅरेटच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 87,550 रुपयांवर पोहोचले आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोनं 95,510 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा सोनं 71,630 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 87,550 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 95,510 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 71,630रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,755रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,551 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,163 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 70,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 76,408 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,304रुपये
22 कॅरेट- 87,550 रुपये
24 कॅरेट-95,510 रुपये
18 कॅरेट- 71,630रुपये