ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; वाचा एक तोळ्याचा भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आणि आजचे दर काय जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 21, 2025, 12:12 PM IST
ग्राहकांना दिलासा! उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; वाचा एक तोळ्याचा भाव
Gold Rate Today 21 march silver price slip from record high in us market mcx update

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वायदे बाजारात आज सोन्याचे दर घसरले आहेत. सराफा बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत. जाणून घेऊया सोन्याचे आजचे दर 

आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमुळं सोनं हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिला जात आहे. त्यामुळं सोन्याच्या  दरात वाढ होत होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं आज $3,040 वर घसरला आहे. त्यानंतर MCX वर सोन्याचे दर घसरले आहेत. MCXवर 1 वर्षात 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं 41 टक्क्यांनी वधारलं आहे. 

सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली असून 18 कॅरेट सोन्याचे दर 321 रुपयांनी कोसळले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 90,220 रुपयांवर पोहोचले आहेत. 

काय आहेत सोन्याचे दर?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  82,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 90,220 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  67,670 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,270 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   9,022 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,767 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   66,160 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   72,176 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    54,136 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 82,700 रुपये
24 कॅरेट- 90,660 रुपये
18 कॅरेट-  67,991 रुपये