ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त;ग्राहकांना मोठा दिलासा; वाचा 22 कॅरेटचे दर

Gold Rate Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा काय आहेत आजचे दर

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 4, 2025, 02:32 PM IST
ऐन लग्नसराईत सोनं झालं स्वस्त;ग्राहकांना मोठा दिलासा; वाचा 22 कॅरेटचे दर
Gold rate today 4 november gold silver price drop check 24 22 18 kt price

Gold Rate today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सोमवारी सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.आज पुन्हा एकदा सोनं घसरल्याने ऐन लग्नसराईच्या दिवसांत ग्राहकांची चिंता मिटली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसराईला सुरुवात होते. आजही भारतात लग्नात मुलीला दागिने देण्याची प्रथा आहे. त्यामुळं आता सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू होणार आहे. या वर्षात सोन्याचे वाढलेले भाव पाहता अनेकांची चिंता वाढली होती. मात्र दिवाळीनंतर सातत्याने सोन्याचे दर उतरताना दिसत आहेत.येत्या काही दिवसांत सोन्याचे दर उतरण्याची शक्यता आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची घसरण झाली असून सोनं प्रतितोळा 1,22,460 रुपयांवर पोहोचलं आहे. 

24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 1,22,460 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 1,12,250 वर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 540 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 91,840 रुपयांवर पोहोचले आहे. 

आजचा सोन्याचा भाव काय?

- 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,460 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 91,840 रुपये

- 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,225 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,246 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,184 रुपये

- 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 89,800 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 97,968 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73,472 रुपये

- मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,460 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 91,840 रुपये

FAQ

प्रश्न १: आज सोन्या-चांदीच्या दरात काय बदल पाहायला मिळाला?

उत्तर: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. यापूर्वी सोमवारी दरात वाढ झाली होती.

प्रश्न २: सोन्याच्या दरात घसरण होण्याचे मुख्य कारण काय सांगितले आहे?

उत्तर: दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रश्न ३: सोन्याच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना काय फायदा झाला आहे?

उत्तर: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर उतरल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता मिटली आहे आणि त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More