दिवाळी-धनत्रयोदशी आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर; 22 आणि 18 कॅरेटचा भाव जाणून घ्या

Gold Price Today 6 October 2025: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घेऊयात.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 6, 2025, 12:42 PM IST
दिवाळी-धनत्रयोदशी आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर; 22 आणि 18 कॅरेटचा भाव जाणून घ्या
Gold Rate Today 6 oct price hike Check 10 Gram Gold Price 24K At Historic High Amid Festive Demand

Gold Price Today 6 October 2025 : दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. आज 6 ऑक्टोबर रोजी 24  कॅरेट सोन्याचा दर 1 हजारांनी वाढला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच सोनं महागल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 24 कॅरेटबरोबरच 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या किंमतीतही तेजी पाहायला मिळतेय. तुम्हीदेखील आज सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तर आजचे भाव जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,370 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 1,20,770 रुपयांवर स्थिरावले आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,250 रुपयांची वाढ झाली असून 1,10,700 रुपयांवर स्थिरावले आहे. तसंच, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,030 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळं प्रतितोळा सोनं 90,580 रुपयांवर स्थिरावलं आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली होती. मात्र आता दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. 

आजचा सोन्याचा भाव काय?

10 ग्रॅम सोनं किंमत

  • 10 ग्रॅम 22 कॅरेट 1,10,700 रुपये
  • 10 ग्रॅम 24 कॅरेट 1,20,770 रुपये
  • 10 ग्रॅम 18 कॅरेट 90,580 रुपये

1 ग़्रॅम सोनं किंमत

  • 1 ग्रॅम 22 कॅरेट 11,070 रुपये
  • 1 ग्रॅम 24 कॅरेट 12,077 रुपये
  • 1 ग्रॅम 18 कॅरेट 9,058 रुपये

8 ग्रॅम सोनं किंमत

  • 8 ग्रॅम 22 कॅरेट 88,560 रुपये
  • 8 ग्रॅम 24 कॅरेट 96, 616 रुपये
  • 8 ग्रॅम 18 कॅरेट 72, 464 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? ( Today Gold Rate in Mumbai Pune)

  • 10 ग्रॅम 22 कॅरेट 1,10,700 रुपये
  • 10 ग्रॅम 24 कॅरेट 1,20,770 रुपये
  • 10 ग्रॅम 18 कॅरेट 90,580 रुपये

FAQ

1) सोन्याचे दर का वाढत आहेत?

सोन्याचे दर वाढण्यामागे सणासुदीच्या काळातील वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, आणि फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील निर्णयांचा प्रभाव आहे. स्पॉट गोल्ड 1.1 टक्क्यांनी वाढून $3,683.24 प्रति औंसवर बंद झाले आहे, तर या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2) सोन्याची गुंतवणूक का लोकप्रिय आहे?

सणासुदीच्या काळात आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. सातत्याने वाढणारे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चमक यामुळे अनेकजण सोन्याकडे गुंतवणुकीसाठी आकर्षित होत आहेत.

3) मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर इतर शहरांपेक्षा वेगळे का असतात?

सोन्याचे दर स्थानिक मागणी, पुरवठा, कर, आणि स्थानिक बाजारपेठेतील मध्यस्थांच्या शुल्कांवर अवलंबून असतात. तथापि, सध्या मुंबई आणि पुण्यातील दर वर नमूद केल्यानुसार एकसमान आहेत.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More