ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा एक तोळ्याचा आजचा भाव

Gold Rate Today In Maharashtra: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जाणून घेऊयात आजचा सोन्याचा दर

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 7, 2025, 01:28 PM IST
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा एक तोळ्याचा आजचा भाव
Gold rate today 7 november gold silver price drop again check 24 22 18 kt price

Gold Rate Today In Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतामुळं डॉलरमध्ये आलेली घसरण यामुळं शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी देशांतर्गंत बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर एकीकडे चांदीच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाहीत. एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळच्या सत्रात सोनं-चांदीचे दर घसरले होते. जाणून घेऊयात आजचा सोन्याचा भाव.

Add Zee News as a Preferred Source

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली होती. या दरम्यान डॉलरचा इंडेक्स 100 अंकांनी घसरला होता. ज्याचा परिणाम आता सोन्याच्या दरावर झाला आहे. देशांतर्गंत सराफा बाजारात आज सोन्याच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास गुरुवारच्या तुलनेत आज शुक्रवारी सोन्याचे दर काहीसे घसरले होते.

24 कॅरेट सोन्याचा दर आज 550 रुपयांनी घसरला असून प्रतितोळा 1,22,020 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली असून 1,11,850 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 410 रुपयांची घट झाली असून 91,520 रुपयांवर सोनं आज स्थिरावलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

- 10 ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,11,850 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,020 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 91,520 रुपये

- 1 ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 11,185 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 12,202 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 9,152 रुपये

 - 8 ग्रॅम सोनं किंमत 

8 ग्रॅम 22 कॅरेट 89,480 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 97,616 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 73,216 रुपये

- मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)

10 ग्रॅम 22 कॅरेट 1,11,850 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,22,020 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 91,520 रुपये

FAQ

प्रश्न: आज (शुक्रवार, 7 नोव्हेंबर) सोन्याच्या दरात काय बदल झाला?

उत्तर: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेतामुळं आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळं आज सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली.

प्रश्न: बाजारात सोन्याच्या दरांवर कशाचा परिणाम झाला?

उत्तर: अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक डिसेंबरमध्ये व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. या दरम्यान डॉलरचा इंडेक्स 100 अंकांनी घसरल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाला.

प्रश्न: आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात किती रुपयांची घसरण झाली?

उत्तर: आज 24 कॅरेट सोन्याचा दर ₹550 रुपयांनी घसरला आहे.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More