सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त, आज काय आहेत सोन्याच्या दर, वाचा 24 कॅरेटचा भाव

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि किती घट झाली जाणून घेऊयात.

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 16, 2025, 12:45 PM IST
सलग दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त, आज काय आहेत सोन्याच्या दर, वाचा 24 कॅरेटचा भाव
Gold Rate Today became fall again silver latest price mcx india Maharashtra Mumbai

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याचे दर वाढत होते मात्र काल आणि आज दर घसरल्याचे पाहायला मिळतेय. तर एकीकडे चांदी 186 रुपयांनी मजबूत होऊन 111672 वर व्यवहार करताना दिसत आहे. आज सोन्या-चांदीचे दर किती आहे, जाणून घेऊयात.

Add Zee News as a Preferred Source

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 99,280 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 91,000 रुपयांवर स्थिरावलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 74,460 रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीची किंमत मंगळवारी 3,000 रुपयांनी घसरून 1,12,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. सोमवारी चांदी 5000 रुपयांच्या तेजीसह 1,15,000 रुपये प्रति किलोगॅम रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 91,000 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 99,280 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 74,460 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,100 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 9,928 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,446 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 72,800रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 79,424 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 59,568 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 91,000 रुपये

24 कॅरेट- 99,280 रुपये

18 कॅरेट- 74,460 रुपये

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More