मुंबई : जून महिन्याच्या सुरूवातीला सोने 49 हजार रुपये प्रतितोळेच्या जवळपास सुरू होते. आतापर्यंत सोने 47 हजार रुपये प्रतितोळे पर्यंत घसरले आहे. दोन आठवड्यांपूर्वी चांदी 68 हजार रुपये प्रतिकिलो घसरली होती. म्हणजेच चांदी या महिन्यातदेखील 4 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
MCX Gold :
सोमवारी मल्टीकमोडिटी एक्स्चेंज (MCX)मध्ये सोनं 46 हजार 940 रुपये प्रति तोळे इतक्या ट्रेडवर बंद झालं. दिवसात 47 हजार 118 रुपयांची उच्चांकी नोंद देखील झाली. त्यामुळे शुक्रवारच्या मानाने सोन्याच्या दरांमध्ये जास्त बदल झाला नाही.
MCX Silver
MCX वर सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरांमध्येही फारसा बदल झाल्याचे दिसून आले नाही. चांदी 67 हजार 914 रुपये प्रतिकिलो नोंदवण्यात आली.
मुंबईतील सोने - चांदीच दर
22 कॅरेट 46,160 रुपये प्रतितोळे
24 कॅरेट 47,160 रुपये प्रति तोळे
चांदी 67,900 रुपये प्रति किलो
( सोने आणि चांदीचे दर हे कोणत्याही टॅक्सशिवाय देण्यात आले आहेत. स्थानिक बाजारपेठांनुसार यात बदल होऊ शकतो)