सोने दरात घसरण सुरुच, यावर्षी आतापर्यंत 4300 रुपये स्वस्त, चांदीही स्वस्त
Gold, Silver Rate Update, 11 August 2021: जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे.
मुंबई : Gold, Silver Rate Update, 11 August 2021: जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे. MCX वरील सोन्याच्या ऑक्टोबर वायद्याने आता प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपयांची लेव्हल तोडली आहे. जरी काल दिवसभरात सोने दरात चांगली वाढ झाली होती असली तरी शेवटच्या तासांमध्ये अचानक दरात घट झाल्याचे दिसून आले. सोने या आठवड्यात प्रथमच 46,000 च्या खाली घसरले. आज सराफा बाजारा 46,000 रुपयांच्या पातळीच्या वर उघडला, परंतु आता बाजारात कमजोरी दिसून येत आहे. सोने 46,000 च्या खाली घसरले आहे. जर तुम्ही गेल्या बुधवारपासून सोन्याच्या किंमतीवर नजर टाकली तर ते अजूनही सुमारे 10 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
या आठवड्यात सोने (09-13 ऑगस्ट)
दिवस सोने (MCX अक्टूबर वायदा)
सोमवार 45886/10 ग्रॅम
मंगलवार 45962/10 ग्रॅम
बुधवार 45998/10 ग्रॅम (ट्रेडिंग)
या आठवड्यात सोने बाजार (02-06 ऑगस्ट)
दिवस सोने (MCX ऑक्टोबर वायदा)
सोमवार 48086/10 ग्रॅम
मंगळवार 47864/10 ग्रॅम
बुधवार 47892/10 ग्रॅम
गुरुवार 47603/10 ग्रॅम
शुक्रवार 46640/10 ग्रॅम
सोने सर्वोच्च पातळीवरून सुमारे 10,300 रुपयांनी स्वस्त
गेल्यावर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात (Gold) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवरील 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आता MCX वर सोने ऑक्टोबर वायदा 45900 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 10,300 रुपयांनी स्वस्त होत आहे.
MCX वर चांदीची चलती
आता चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, चांदीचा सप्टेंबर वायद्यातदेखील बुधवारी चांगली तेजी पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या तासांमध्ये वायदाबाजारात दरात मोठ्याप्रमाणात घसरन दिसून आली. जरी चांदीचे वायदे पूर्णपणे कोसळले तरी इंट्राडेमध्ये चांदीचा वायदा देखील 63240 च्या पातळीवर गेला आणि 62184 रुपयांवर घसरला. आज चांदीचा सप्टेंबर वायदा घसरणीसह सुरू झाला आहे, चांदी 62500 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यापार करत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी चांदीचा वायदा 67500 रुपयांच्या जवळ होता. म्हणजेच, चांदी केवळ एका आठवड्यात 5000 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
या आठवड्यात चांदीचा दर
दिवस चांदी (MCX सप्टेंबर वायदा)
सोमवार 62637/किलो
मंगळवार 62636/किलो
बुधवार 62500/किलो (ट्रेडिंग)
या आठवड्यात चांदीचा वायदा
दिवस चांदी (MCX सितंबर - वायदा)
सोमवार 67889/किलो
मंगळवार 67914/किलो
बुधवार 67500/किलो
गुरुवार 66998/किलो
शुक्रवार 65000/किलो
चांदी 17500 रुपयांनी स्वस्त झाली
चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79,980 रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार, चांदी देखील त्याच्या सर्वोच्च पातळीवरून सुमारे 17500 रुपयांनी स्वस्त आहे. आज चांदीचा जुलै वायदा 62500 रुपये किलो आहे.
सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर
सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मंगळवारी, सोने प्रति 10 ग्रॅम 46525 रुपये, बुधवारी 46220 रुपयांवर विकले गेले. सराफा बाजारात चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे, मंगळवारी चांदीचे वायदे 64186 रुपये किलोने विकले गेले, बुधवारी त्याची किंमत 62847 रुपये प्रति किलो झाली.