मुंबई : तब्बल 69 वर्षांनंतर टाटा समुहानं (Tata Group)एअर इंडिया (Air India)या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीचा ताबा परत मिळवला. साऱ्या देशातून यासाठी टाटा समुहाला शुभेच्छा देण्यात आल्या. अर्थात रतन टाटासुद्धा यामध्ये मागे राहिले नाहीत. टाटा या नावाच्या, उद्योगसमूहाच्या छत्रछायेत असणाऱ्या बऱ्याच उद्योगांना वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या रतन टाटा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कृतीतून सर्वांची मनं जिंकली आहेत. (Ratan Tata)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियाचा ताबा मिळाल्यानंतर फ्लाईटमधील प्रवाशांसाठी, साऱ्या देशासाठी त्यांनी एक खास आणि आपुलकीचा संदेश पाठवला. 


काय म्हणाले रतन टाटा?
'टाटा समुह एअर इंडियाच्या नव्या प्रवाशांच्या/ ग्राहकांच्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहे. विमानसेवांमध्ये प्रवाशांच्या सुखसोयी आणि निवडीच्या बाबतीत तुमच्यासोबत मिळून काम करण्यासाठी आम्ही टाटा समुह उत्सुक आहोत', असं ते म्हणाले. 


वयाचा आकडा वाढत असतानाही उद्योजकाची दूरदृष्टी आणि आपल्या माणसांप्रती असणारी ही ओढ पाहून सर्वांनाच प्रचंड अभिमान वाटला. 


एअर इंडियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा मेसेज देण्यात आला. 



कायमच प्रवासाला जाताना बहुविध विमानसेवांचा वापर करणारे अनेकजण आता एअर इंडियानं प्रवास करण्यासाठी आणि भावी काळात होणारी प्रगती पाहण्यासाठी आतुरले असल्याचं पाहायला मिळत आहे. 


काय मग, आपल्या हक्काच्या एअर इंडियानं तुम्ही कधी प्रवास करताय?