अहमदाबाद : गुजरात काँग्रेसच्या प्रवक्त्या रेखाबेन चौधरी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय.


काँग्रेसमधली नाराजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातची निवडणुक काही आठवड्यांवर येउन ठेपली असतांना त्यांनी हा निर्णय घेतलाय. रेखाबेन चौधरी यांच्या राजीनाम्यामागचं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी त्या तिकीट वाटपावरून नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर आल्या आहेत. 


सर्वच पक्षात बंडखोरी


या प्रकारे महत्वाच्या नेत्यांनी पक्ष सोडण्याची वेळ येणारा काँग्रेस हाच एकमेव पक्ष नसून भाजपलाही या प्रकारच्या नाराजीला सामोरं जावं लागणार आहे. मागच्या आठवड्यात भाजप नेते आणि कांजीभाई पटेल आपल्या मुलासोबत पक्षातून बाहेर पडले होते. 


दोन टप्प्यात निवडणुक


दोन्ही पक्षांनी आपपल्या उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरूवात केली आहे. काँग्रेस आणि भाजपमधली लढत कडवत बनली आहे. भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. 9 डिसेंबरला 89 जागांसाठी आणि 14 डिसेंबरला 93 जागांसाठी अशा दोन टप्प्यात गुजरातची निवडणुक पार पडणार आहे.