इतिहासातील विषारी सुलतान, जिच्यासोबत शरिरसंबध ठेवायचा तिचा मृत्यू व्हायचा; अंगावर माशी बसली तरी ती मरायची, गुजरातशी थेट कनेक्शन

इतिहासात एक असा विषारी सुलतान होऊन गेला. हा सुलतान इतका विषारी होता की याच्याशी शरिरसंबध ठेववणाऱ्या स्त्रीचा मृत्यू व्हायचा. अंगावर बसलेली माशीही मरायची  

वनिता कांबळे | Updated: Jan 25, 2025, 08:10 PM IST
 इतिहासातील विषारी सुलतान, जिच्यासोबत शरिरसंबध ठेवायचा तिचा मृत्यू व्हायचा; अंगावर माशी बसली तरी ती मरायची, गुजरातशी थेट कनेक्शन

Mahmud Begada: इतिहासात अनेक राजा महाराजा तसेच सुलतान होऊन गेले. शौर्य आणि पराक्रम यासह अनेक राजे महाराजे हे त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे आजही चर्चेत आहेत. यापैकीच एक आहे सुलतान महमूद बेगडा (Mahmud Begada). इतिहासातील विषारी सुलतान अशी त्याची ओळख आहे. हा सुलतान ज्या स्त्रीसह शारीरिक संबंध बनवायचा त्या स्त्रीचा मृत्यू व्हायचा. इतकचं नाही तर एकादी माशी जरी या सुलतानच्या अंगवार बसली तरी माशी देखील मरायची इतका हा राजा विषारी होत. 

Add Zee News as a Preferred Source

हे देखील वाचा... 365 राण्यांचा एकच राजा! भारतातील 'या' राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच मिळायची एंट्री 

सुलतान महमूद बेगडा याचे पूर्ण नाव अबुल फत नासिर-उद-दीन महमूद शाह प्रथम असे आहे. या सुलतानचे थेट कनेक्शन गुजरातशी आहे. अतिश खुनशी अशा स्वभावाच्या या राजाचे जेवण देखील राक्षसी होता. हा राजा एकावेळेस 37 किलो अन्न तसेच 150 केळी खायचा. पोर्तुगीज प्रवासी बाबोसा यांनी आपल्या 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात या विषारी राजाचा उल्लेख केला आहे. 

महमूद बेगडा याला  लहानपणी विष पाजून त्याचे पालनपोषण करण्यात आले. कोणी विष देऊन महमूदला मारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर या विषाचा कोणताही परिणाम होऊ यासाठी त्याला लहानपणीच थोडे विष देण्यात आले. महमूदला त्याच्या जेवणात सौम्य विष मिसळून दिले जात होते. यामुळे महमूदचे संपूर्ण शरीर विषारी झाले असे 'द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात म्हंटले आहे. 

सुल्तान महमूद बेगडा याच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा मृत्यू व्हायचा. महमूदच्या अंगावर माशी जरी बसली तरी या माशीचा मृत्यू व्हायचा असा दावा द बुक ऑफ ड्युरेट बाबोसा खंड 1' या पुस्तकात करण्यात आला आहे. 
इटालियन प्रवासी लुडोविको डी वर्थेमा याने देखील त्याच्या 'इटिनेरिओ डी लुडोविको डी वर्थेमा बोलोग्निस' या पुस्तकात सुल्तान महमूद बेगडा याच्या विषारी असण्याचा उल्लेख केला आहे. सुल्तान महमूद बेगडा इतका विषारी होता की सुपारी खाल्ल्यानंतर जर एखाद्यावर थुंकला तर त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. 

सुल्तान महमूद बेगडाबद्दल अशीही एक कथा चर्चेत आहे की त्याची भूक राक्षसासारखी होती. तो दिवसाला 35 किलो अन्न खात असे. तो एका वेळी 150  केळी खाऊ शकतो.
सुल्तान महमूद बेगडा याचे गुजरातशी थेट कनेक्शन आहे. गुजरातमधील पावागड येथील कालिका माता मंदिर गुजरातच्या सुलतान महमूद बेगडा यांनी नष्ट केले आणि पीर सदनशाहच्या दर्ग्यात रूपांतरित केले होते. दोन वर्षांपूर्वी याच मंदिरात  पीएम मोदींनी तब्बल  500 वर्षांनंतर ध्वज फडकावला. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More