नवी दिल्ली : विविध कार्यक्रमांमध्ये कलाकारांवर नोटांची उधळण केल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आला आहे. एका संगीत कार्यक्रमात काँग्रेस आमदाराने गायकावर नोटांची उधळण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील सोमनाथ जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात काँग्रेस आमदार अमरीश डेर यांनी नोटांची उधळण केली आहे. सोमनाथ जिल्ह्यातील बोडीदर गावात आहिर समाजाने 'एकता महोत्सव' दरम्यान संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात काँग्रेसचे राजुला येथील आमदार अमरीश डेर, भाजप नेता आणि जामनगर येथील खासदार पूनमबेन मादम मुख्य अतिथींच्या रुपात उपस्थित होते.



लाखो रुपयांची उधळण


व्हिडिओत दिसत आहे की कशाप्रकारे नोटांची उधळण केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किर्तिदान गढवी यांनी गाण्यास सुरुवात करताच आहिर समाजाच्या तरुणांनी त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित आमदार अमरीश डेर यांनी सुद्धा लाखो रुपये उडवले. 


यामध्ये खासदार पूनमबेन मादम सुद्धा मागे राहील्या नाहीत आणि त्यांनीही मन भरुन नोटांची उधळण केली. 


(व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा)


श्री कृष्णाच्या गाण्यावर नोटांचा पाऊस


लोक गीत कार्यक्रमात किर्तिदान गढवी यांनी श्री कृष्णाचं गीत गायलं. यावेळी उपस्थित नागरिक आणि नेत्यांना हे गीत खूपच आवडलं त्यानंतर त्यांनी नोटांचा अक्षरश: पाऊसच पाडला. गायक गढवी यांच्यावर जवळपास पंचवीस ते तीस लाखांची उधळण केल्याची माहिती समोर येत आहे.