सूरतमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याचं 23 वर्षीय शिक्षिकेकडून अपहरण, नंतर केला गर्भपात; पोलिसांना वेगळाच संशय

Gujrat Crime News: गुजरातमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 17, 2025, 03:52 PM IST
सूरतमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याचं 23 वर्षीय शिक्षिकेकडून अपहरण, नंतर केला गर्भपात; पोलिसांना वेगळाच संशय
अनेक प्रश्न अनुत्तरित

Teacher Kidnap Student: गुजरातमधील सूरत शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एक 23 वर्षीय शिक्षिकेने 13 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शिक्षिकेने अपहरणानंतर 22 महिन्यांचा गर्भ पोटात वाढत असताना गर्भपात केल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळेच या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गरोदर राहिली नाही ना याची चाचपणी आता पोलिसांकडून केली जात आहे. त्यासाठीच गर्भाच्या पितृत्व निश्चितच्या उद्देशाने डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. सदर चाचणीसाठी गर्भाचे डीएनए नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल

गुरुवारी पहाटेच्या सुमारास स्माइमर रुग्णालयात डीएनए कलेक्शनची प्रक्रिया पोलिसांच्या देखरेखीखाली पार पडली. आरोपी शिक्षिकेला सुरत मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यासोबत 'पळून' गेल्याचा आरोप असलेली ही शिक्षेका सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भारतीय न्याय संहिताच्या कलम 137 (2) (अपहरण), 127 (3) (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवल्याबद्दल शिक्षा) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत या शिक्षेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी पुनागम पोलिस ठाण्यात या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राजस्थानच्या सीमेजवळ सापडले दोघे

विद्यार्थ्याला पळवून घेऊन गेलेली ही शिक्षिका 29 एप्रिल रोजी गुजरात-राजस्थान सीमेजवळील शामलाजीजवळ आढळळे. या मुलाला मानसिक धक्का बसला असल्याने त्याचे समुपदेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिली आहे. हे दोघेही शामलाजीमधील सीसीटीव्हीमध्येही एकत्र कैद झाले आहेत.

गर्भपात अर्ज मंजूर अनेक प्रश्न अनुत्तरित

मंगळवारी, विशेष पोक्सो न्यायालयामध्ये न्यायाधीश आर आर भट्ट यांनी अविवाहित आरोपीने म्हणजेच शिक्षिकेच्यावतीने दाखल करण्यात आलेला वैद्यकीय गर्भपात (एमटीपी) अर्ज मंजूर केला. सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून पालकांनी अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे दोघे कसे पळून गेले? शिक्षिकेने विद्यार्थ्याला कशापद्धतीने फूस लावली? विद्यार्थ्याळा पळून नेण्यासाठी या शिक्षिकेला कोणी मदत केली का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलीस शोधत असतानाच आरोपीने गर्भपात केल्याची माहिती मिळाली. आता या अनुषंगाने आता तपास केला जात आहे.