मुंबई : पोलिसांनी (Police) एक अजब दावा केल्याने सगळेच हैराण झाले आहेत. त्याचवेळी अरे काय पण, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हरियाणातील (Haryana) फरीदाबाद (Faridabad) शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस ठाण्याच्या गोडावूनमधून 29 हजार लिटर दारूच्या (Liquor) बाटल्या आणि कंटेनर गायब झाले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे काम उंदरांनी केले आहे. उंदरांनी (Rat) मद्याबरोबर गांजा, अफू या मादक पदार्थांची पाकिटेही कुरतडली आहेत. एका वर्षानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून डेटा गोळा केला जात होता. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये, 53,473. लीटर देशी दारू, 29,995  इंग्लीश दारु, बीअरचे 2804 कॅन आणि 805 लिटर कच्ची दारू जप्त केली होती. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेल्या 824 प्रकरणांत सर्व दारू जप्त करण्यात आली होती. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हे दारू जप्त करण्यात आलेली दारु गोडावूनमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, ही दारु उंदरांनी प्राशन केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


या महिन्यात 2230 लिटर दारु नष्ट करणार


824 प्रकरणांपैकी कोर्टाने 49 प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे. अशा परिस्थितीत पोलीस या महिन्यात 982 लिटर देशी दारू, 1169 इंग्रजी दारू आणि 30 बिअर कॅन नष्ट करतील. ही दारु नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. या समितीत इतर दोन अधिकारी आणि मान्यवर लोकांचा समावेश असेल.


उंदरांनी संपवली दारु


उंदरांनी जास्तीत जास्त देशी दारूच्या बाटल्या कुरतडल्या आहेत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. देशी दारूच्या बाटल्या प्लास्टिक आहेत. त्याचवेळी, कच्च्या मद्य प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये देखील असते. अशावेळी उंदरांनी त्यांचे अधिक नुकसान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उंदरांनी देशी आणि कच्ची दारु असे सुमारे 20,000 लिटर मद्य वाया गेले आहे. उंदरांच्या कुरतडल्यामुळे दारु वाहून गेली आहे. त्याचवेळी इंग्लीश दारुच्या बाटल्यांचे झाकण तोडून उंदीरांनी जप्त केलेली सुमारे 9 हजार लिटर दारू गायब केली, असे काही पोलिसांचे म्हणणे आहे.