नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर इथं भारतीय हवाई दलाचं Mi-17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Gp Capt Varun Singh) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षीच शौर्य चक्राने सन्मान
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Gp Capt Varun Singh) यांचा स्वातंत्र्य दिनी शौर्य चक्राने (Shaurya Chakra) सन्मान करण्यात आला होता. 2020 मध्ये हवाई आपत्कालीन परिस्थितीत एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला. भारतीय वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर सध्या वेलिंग्टन इथल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


CDS बिपीन रावत यांचं निधन
तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) शहीद झाले. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 14 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालं. सीडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव उद्या दिल्लीला आणलं जाणार आहे.