नवी दिल्ली : तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे देखील होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह रावत यांनी जनरल बिपिन रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. या अपघाताबाबत माहिती कुटुंबीयांना देण्यासाठी सिंह त्यांच्या घरी गेले. सुमारे 10 ते 15 मिनिटं संरक्षणमंत्री रावत यांच्या निवासस्थानी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत उद्या देणार निवेदन
या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे वायु सेनेने सांगितलं आहे. वायु सेनेचं Mi-17VH हेलिकॉप्टरने कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केले. त्यानंतर कुन्नुरजवळ हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेची संपूर्ण माहिती संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून, उद्या म्हणजे गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत या अपघाताबाबत निवेदन देणार आहेत.


हवाईदल प्रमुख अपघातस्थळी रवाना
भारतीय वायु सेनचे प्रमुख व्हीआर चौधरी कुन्नूर इथल्या अपघातस्थळी रवाना झाले आहेत. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हेही घटनास्थळी रवाना झाले आहेत. एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या डीजीपींना तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले होते.