नवी दिल्ली : आपले संसदीय क्षेत्र मथुरा येथे पहिल्यांदाच हेमा मालिनी यांनी नृत्य सादर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कृष्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वृदांवनात सध्या भगवान राधारमण यांच्या सेवेचा महोत्सव चालू आहे.



हा महोत्सव ३ जानेवारीला वृदांवन येथे साजरा करण्यात आला. याचदरम्यान मथुराचे खासदार हेमा मालिनी राधा रमण मंदिरात पोहचल्या.



येथे त्यांनी फक्त देवाचे दर्शन घेतले नाही तर बहारदार नृत्य सादरीकरणरही केले.



यात त्यांनी सर्वात आधी बाल गोपाल रिझा रही मॉं यशोदा यांच्यावरील सुंदर भजनावर नृत्य सादर केले. त्यानंतर त्यांनी राधा आणि कृष्णावर आधारित गीत 'गोविंद के पद अष्ठ पदम' यावर सादरीकरण केले. 



हेमा मालिनी यांनी सुमारे ४५ मिनिटे सादरीकरण केले. हेमा मालिनी या अभिनेत्री असण्याबरोबरच प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहेत. त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना देओल अनेकदा त्यांच्यासोबत नृत्य सादर करतात.



हेमा मालिनी यांच्या दोन्हीही मुलींनी ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.