Himachal Pradesh Mandi Cloudburst : हिमाचलमध्ये निसर्ग कोपला. 50 हून अधिक वाहनं एकाच वेळी ढिगाऱ्याखाली.. मृतांचा आकडा वाढण्याची भीती...

Himachal Pradesh Mandi Cloudburst : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांपैकी एक, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेक पर्यटकांचा ओघ असणाऱ्या हिमाचल प्रदेश राज्यावर सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून येथील बहुतांश मार्गांवर भूस्खलनाच्या घटना घडलेल्या असतानाच आता पुन्हा एकदा हिमाचलमध्ये निसर्गाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे.
सोमवार आणि मंगळवारी हिमाचलच्या मंडी इथं ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं स्थानिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. निसर्गाचं हे रुप अनेकांसाठीच अनपेक्षित असल्या कारणानं एकाएकी पाणी आणि चिखलाचा लोंढा आला, ज्यामुळं या आपत्तीनं काहींचा जीवही घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी गिली. ढगफुटी झाल्यानं मंडी आणि नजीकच्या बहुतांश गावांमध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळालं.
वाट आणि वाव मिळेल तसा मातीचा ढिगारा, चिखल आणि पाणी गावामध्ये वाहून आलं आणि त्यानं अनेक घरांना गिळंकृत केलं. स्थानिकांच्या माहितीनुसार अतिमुसळधार पाऊस आणि अचानक ओढावलेल्या या संकटामुळं सावरण्याचा एकही क्षण न मिळाल्यानं या भागात झालेलं नुकसानाच प्रमाण मोठं आहे. हे संकट इतकं मोठं होतं की अनेकांनी घराच्या खिडक्या तोडून तिथून पळ काढला, ज्यामुळं अनेकांचा जीव वाचला अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती असा चिंतेचा सूर आळवला.
#WATCH | Himachal Pradesh | Flood-like situation in various parts of Mandi following heavy rainfall in the city. pic.twitter.com/IGnc9qGQ0n
— ANI (@ANI) July 29, 2025
देखिए बीती रात हुई मूसलाधार बारिश के बाद मंडी के हालात - नालों में उफान , कई वाहन क्षतिग्रस्त।#Mandi #HimachalPradesh #DDNewsHimachal pic.twitter.com/nwPd4XwJ9m
— DD News Himachal (@DDNewsHimachal) July 29, 2025
हिमाचल के मंडी में मूसलधार बारिश के चलते कई हिस्सों में बाढ़ जैसे हालात; गाद और कीचड़ से कई वाहन क्षतिग्रस्त; सामान्य जन-जीवन प्रभावित#HimachalPradesh #mandi #HeavyRainfall pic.twitter.com/CIgKITmFma
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) July 29, 2025
प्रशासकीय माहितीनुसार या संपूर्ण आपत्तीमध्ये 50 हून अधिक वाहनं ढिगाऱ्याखाली आली. घटनेची माहिती मिळताच तातडीनं एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि इतर प्रशासकीय तुकड्या पोहोचल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं. सध्याच्या घडीला या भागात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळं बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. तर, काही भागांमध्ये वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडीत झाल्याचंही वृत्त समोर येत आहे.