Amit Shah on Delhi Red Fort Blast: दिल्लीमधील लाल किल्ला येथे झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेमकं काय घडलं आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. अमित शाह यांनी ANI शी संवाद साधताना याचा सखोल तपास सुरु असून, जे काही निष्पन्न होईल त्याची माहिती जनतेला दिलं जाईल असं स्पष्ट सांगितलं आहे. तसंच याप्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचंही सांगितलं आहे. एनएसजी आणि एनआयए टीम एफएसलसह सखोल तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
"लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्राफिक सिग्नलजवळ i20 हुंडाई गाडीत एक स्फोट झाला आहे. स्फोटामुळे आसपासच्या काही गाड्या आणि तेथून जाणारे काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक सूचनेनुसार काहींचा मृत्यूही झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटात दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांचची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत," असं अमित शाह यांनी सांगितलं.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort Metro Station | Union Home Minister Amit Shah says "This evening, around 7 pm, a blast occurred in a Hyundai i20 car at the Subhash Marg traffic signal near the Red Fort in Delhi. The blast injured some pedestrians and damaged some vehicles.… pic.twitter.com/BfRei3r3tx
— ANI (@ANI) November 10, 2025
"एनएसजी आणि एनआयए टीम एफएसलसह सखोल तपास करत आहेत. आजुबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. माझं पोलीस आयुक्त आणि स्पेशल ब्रांचचे इंचार्ज यांच्याशी बोलणं झालं आहे. ते घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. आम्ही सर्व शक्यता लक्षात घेत याचा सखोल तपास केला जाईल. तात्काळ तपास करुन त्यातून जे निष्पन्न होईल ते जनतेसमोर ठेवू," असंही त्यांनी सांगितलं आहे.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort Metro Station | Union Home Minister Amit Shah meets the people injured in the blast, at Lok Nayak Hospital. pic.twitter.com/IMPj2c77rv
— ANI (@ANI) November 10, 2025
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारचा जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर आगीच्या ज्वाला निघाल्या आणि जवळपासच्या तीन-चार वाहनांना वेढले. प्राथमिक तपासानंतर, दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, संध्याकाळी 6.52 वाजता एक कार हळूहळू जात होती आणि सिग्नलला थांबली. त्या कारमध्ये स्फोट झाला.
आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 24 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या मेट्रो स्थानक आणि काही घरांच्या काचा फुटल्या.
सुरक्षेच्या दृष्टीने, दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. एनआयए टीम घटनास्थळी पोहोचली आहे. एनआयए फॉरेन्सिक टीमनेही तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिस आयुक्त देखील लाल किल्ला परिसरात उपस्थित आहेत. एनएसजी टीमनेही तपास सुरू केला आहे, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले जात आहेत.
दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून संपूर्ण घटनेची माहिती दिली. गृहमंत्रालय संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. गृहमंत्रालयानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांच्याकडून स्फोटाची माहिती घेतली आहे. दरम्यान, अमित शाह यांनी सांगितले की, हा स्फोट हुंडई i20 कारमध्ये झाला होता, ज्यामध्ये तीन जण होते. कारच्या मागील बाजूस स्फोट झाला. गृहमंत्री अमित शाह स्वतः घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहोचले आहेत.
दिल्लीतील स्फोटानंतर, उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संपूर्ण देशाचं दिल्लीतील स्फोटावर लक्ष आहे. नोएडामध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे,
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.