कुकरचा रब्बर सैल झाल्यामुळे सगळा गॅस बाहेर निघून जातो, 5 मिनिटांत होईल काम

Kitchen Tips : कुकर हा अनेक महिलांच्या मदतीचं भांड आहे. एकाचवेळी असंख्य काम करणाऱ्या कुकरचा रब्बर सैल झाला तर... 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 6, 2023, 06:10 PM IST
कुकरचा रब्बर सैल झाल्यामुळे सगळा गॅस बाहेर निघून जातो, 5 मिनिटांत होईल काम

Cooker Rubber Tips : महिलांना जेवण बनवताना अनेक दिव्यातून जावं लागतं. एक मोठा अडथळा म्हणजे कुकरचा रब्बर सैल होणे. रोजच्या वापरातील कुकर असा अचानक काम करेनासा झाला की, खूप तारांबळ उडते. अनेक महिला सगळंच जेवण कुकरमध्ये करतात. अगदी भात, वरण, भाजी, केक यासारखे अनेक पदार्थ कुकरमध्ये होतात. कुकर सैल होऊन सगळी हवा बाहेर निघून जाते. अशावेळी पदार्थ शिजायला कठिण होते. अशावेळी नेमकं काय करायचं हे महिलांना कळत नाही. तेव्हा फक्त 5 टिप्सच्या मदतीने अवघ्या 5 मिनिटांत रब्बर करा ठीक. 

Add Zee News as a Preferred Source

थंड पाण्याने धुवा 

कुकरच्या रबरमधून हवा जात असेल किंवा तो सैल होतोय असं वाटत असेल तर थंड पाण्याचा वापर करा. रब्बर 5 मिनिटे थंड पाण्यात ठेवा किंवा थंड पाण्याच्या नळाखाली रब्बर ठेवा. 

फ्रिजरमध्ये ठेवा

रब्बर अतिशय सैल होतो तेव्हा तो 15 ते 20 मिनिटे फ्रिजरमध्ये ठेवा. यामुळे तो आकुंचन पावतो आणि अगदी पूर्वापार होतो. 

गव्हाच्या पीठाचा वापर 

कणिक जेव्हा मळतो तेव्हा त्यातील काही कणिक हे रब्बर भोवती फिरवून ठेवा. जसे जसे कणिक सुकेल तसे ते आकुंचन पावते. आणि रब्बर घट्ट होतो. 

टेपचा वापर 

कुकरचा रब्बर घट्ट करण्यासाठी टेपचा वापर करा. कोणतीही चिकट टेप कुकरच्या रब्बरला गुंडाळा. 

अशी घ्या रब्बरची काळजी 

जेवण बनवून झाल्यास तात्काळ रब्बर स्वच्छ करावा 
रब्बर कायम झाकणातून बाहेर काढून ठेवावे 
रब्बर ओला करून ठेवावा 
वापरल्यानंरतर थंड पाण्यात ठेवावे 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More