LPG Gas Cylinder Booking Cashback offer:  गेल्या काही महिन्यात जीवनाश्यक वस्तूंचे भाव झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. घरगुती स्वयंपाकाचा सिलिंडर देखील महागला आहे. देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशात गृहणींना बजेट सांभाळणं कठीण झालं आहे. पण आता गृहणींसाठी बजेट बातमी आहे. स्वयंपाक गॅस सिलेंडरची किंमत परवडणारी नसली तरी बूक करताना तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता अनेक राज्यांमध्ये 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1000 ते 1100 रुपयांदरम्यान आहे. काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून सिलेंडर बूक करताना कॅशबॅक ऑफर मिळवू शकता. बजाज फायनान्स लिमिटेडकडून बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपच्या माध्यमातून सिलिंडर बूक केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल. बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपच्या (Bajaj Fineserv App) माध्यमातून स्वयंपाक गॅस सिलेंडर बूक केल्यानं फायदा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅप गॅस सिलेंडर बुकिंगवर 50 रुपये निश्चित कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही प्रोमोकोडची आवश्यकता नाही. ही ऑफर प्रत्येक महिन्याला एकदाच मान्य असेल. 10 टक्के कॅशबॅक मिळवण्यासाठी Bajaj Pay UPI वरून पेमेंट करावं लागेल. यासाठी बँक अकाउंट Bajaj Pay UPI ला लिंक करावं लागेल. 


बातमी वाचा- Income Tax: तुमच्या कोणत्या कमाईवर कर आकारला जात नाही? जाणून घ्या


Bajaj Finserv App सिलेंडर बूक करण्याची प्रोसेस


  • सर्वात आधी Bajaj Finserv अ‍ॅप ओपन करा.

  • त्यानंतर होम पेजवर LPG Gas वर क्लिक करा.

  • आता Select Provider या ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हाइडर ऑप्शन येईल. तिथे सर्व्हिस प्रोव्हाइडर सिलेक्ट करा.

  • कंज्यूमर नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून घ्या.

  • आता बुकिंगची रक्कम सिस्टमद्वारे सांगितली जाईल.

  • पेमेंट मोडमध्ये Bajaj Pay UPI सिलेक्ट करा. तरच तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

  • ट्रान्सजक्शननंतर स्क्रॅच कार्ड मिळेल. कॅशबॅक अमाउंट तुमच्या Bajaj Pay Wallet मध्ये क्रेडिट होईल.