मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? अनेक महत्त्वाची कामे करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. म्हणजेच अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही आजपर्यंत केल्या नसतील तर तुम्हाला ते लगेच करावे लागेल. कारण 31 ऑक्टोबरनंतर तुम्ही ते करू शकणार नाही. पीएम किसान योजना (पीएम किसान) मध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख देखील 31 ऑक्टोबर आहे.


1. पीएम किसान योजनेसाठी नोंदणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत  नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. जर त्यांनी या कालावधीत स्वतःची नोंदणी केली तर त्यांना दोन हप्ते मिळतील म्हणजे त्यांना 4 हजार रुपयांचा फायदा होईल.


2. HDFC विशेष ऑफर


जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर गृहनिर्माण वित्त कंपनी HDFC ची विशेष ऑफर या महिन्यात 31 ऑक्टोबर रोजी संपेल. एचडीएफसीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. या अंतर्गत, ग्राहक वार्षिक 6.70% या प्रारंभिक व्याजदराने गृहकर्ज घेऊ शकतात. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.


3. SBI ग्राहक मोफत ITR दाखल करू शकतात


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक आता विनामूल्य इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरू शकतात. SBI ग्राहक YONO अॅपवर Tax2Win द्वारे ITR दाखल करू शकतात. SBI ने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, तुम्ही Tax2Win द्वारे YONO वर हे मोफत करू शकता. ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत आहे.


4. वाहनाची नोंदणी करा आणि DL नूतनीकरण करा


तुमच्या वाहनाची नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस सर्टिफिकेट यासारख्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या कागदपत्रांचे नूतनीकरण करायचे असेल तर ते लवकर पूर्ण करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला सांगतो की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि परमिटची वैधता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.