लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यावरच मिळणार दारु - या राज्यात कडक अंमलबजावणी
हे पोस्टर पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल कारण त्या पोस्टरवर असे लिहिले आहे की, लोकांनी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिल्यावरच दारू विकली जाईल. म्हणजेच `प्रथम लस घ्या, नंतर मद्यपान करायला या.`
अलिगड : उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात दारूच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. अलिगडमध्ये विषारी दारूच्या घटनेनंतर राज्यात प्रशासन आणि पोलिस पूर्णपणे सक्रीय झाले आहेत. यामुळे दारूच्या ठेक्यांसह, सर्वत्र इंग्रजी दारूच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. या अनुषंगाने उत्तर प्रदेशमधील सैफई येथील एसडीएम हेम कुमार सिंग यांनी आपल्या भागातील पोलिस दलासह दारूचे ठेके, इंग्रजी दारूची दुकाने तपासली. त्याचवेळी त्यांनी दुकानांवर पोस्टर देखील लावले.
हे पोस्टर पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल कारण त्या पोस्टरवर असे लिहिले आहे की, लोकांनी कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दिल्यावरच दारू विकली जाईल. म्हणजेच "प्रथम लस घ्या, नंतर मद्यपान करायला या."
लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करू नये, अशा कडक सूचना एसडीएमने दुकानदारांना दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, देशात आत्तापर्यंत केवळ तीन टक्केच लसीकरण झाले असल्याने, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी हा मार्ग अवलंबला गेला आहे. तसेच दारूची दुकाने महसूल वाढवण्यात राज्याला हातभार लावतात. त्यामुळे हे देखील पोस्टर लावण्यामागचे आणखी एक कारण असू शकते.
दुकानदाराला या प्रकारा विषयी विचारले असता, दुकानदार म्हणाला की, "एसडीएम साहेब आले तेव्हा त्यांनी हे पोस्टर लावले आणि आम्हाला बजावले आहे की, लसीकरण प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणालाही दारू विकू नका. आता आम्ही बहुतेक लोकांना लस घेण्यास सांगत आहोत. बरेच लोकं लसीकरणाचे प्रमाणपत्र न घेता आले, त्यांना दारू न देता आम्ही परत पाठवत आहोत."
या संपूर्ण घटनेवर प्रक्रिया देताना उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, दारू दुकानदारांनी ग्राहकांना लस घेयायला सांगितले पाहिजे असे अधिकृत आदेश नाहीत. परंतु जर सैफईचे एसडीएम हे करत असतील, तर ते त्यांच्या स्वत: च्या निर्णयावरुन करत आहेत. लसीकरणासाठी प्रेरित करणे चांगली गोष्ट आहे, परंतु हे अल्कोहोल विक्रीसाठी गरजेचे नाही.