IIT मधून शिकलेल्या पोरांना लॉटरी लागली; डायरेक्ट कोट्यावधीच्या पॅकेजचा Job मिळाला

उल्लेखनीय बाब म्हणजे, IIT खडगपूर हे एकमेव IIT आहे ज्या ठिकाणी प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी 2.68 कोटींची सर्वोच्च पॅकेज ऑफर मिळाली आहे.

Updated: Dec 6, 2022, 08:27 PM IST
IIT मधून शिकलेल्या पोरांना लॉटरी लागली; डायरेक्ट कोट्यावधीच्या पॅकेजचा Job मिळाला

IIT Kharagpur : आयआयटी खडकपूरने प्लेसमेंट 2022 मध्ये चांगलं यश प्राप्त केलं आहे. 1300 पेक्षा अधिक प्लेसमेंटच्या ऑफरसोबत यावर्षी पाचव्या दिवसाच्या अंताला युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांना 1000 पेक्षा अधिक ऑफर मिळाल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, IIT खडगपूर हे एकमेव IIT आहे ज्या ठिकाणी प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी 2.68 कोटींची सर्वोच्च पॅकेज ऑफर मिळाली आहे.

यामध्ये कॅम्पस प्लेसमेंट 2022-23 मध्ये एकूण 760 ऑफर समाविष्ट आहेत. जे सर्व IIT मध्ये सर्वाधिक असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना जपान (28), तैवान (9), यूएस (3) आणि सिंगापूर (2) आणि इतर (3) कडून एकूण 45 आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या असल्याची नोंद आहे.

आयआयटी खडकपूरने जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, बहुराष्ट्रीय नियोक्त्याचा संस्थेवर असलेला विश्वास यामधून सर्वांना दिसून येतोय. याची सुरुवात एकूण 900 इंटर्नशिपसह झाली. इतकंच नाही तर त्यानंतर दिवसाच्या शेवटी 760 हून अधिक ऑफर मिळाल्या आहेत.

आयआयटी खडकपुरला सर्वाधिक 2.65 कोटींची ऑफर

त्यांनी असंही नमूद केलं आहे की, एनालिटिक्स, सॉफ्टवेयर, फायनांस-बँकींग, सप्लाय चेन, लॉजिस्टिक, कंसल्टिंग, कोर-इंजीनियरिंग, हाय फ्रीक्वेंसी ट्रेडिंगसोबत सर्व क्षेत्रातील कंपन्यांकडून 1 कोटीपासून 2.65 कोटीपर्यंतच्या 10 मोठ्या ऑफर मिळाल्या आहेत. 

प्रो. ए. राजकुमार, CDC चे अध्यक्ष राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार, “या संस्थेने पहिल्याच दिवशी ऑफरचा स्वतःचाच विक्रम मोडलाय. यामुळे आगामी काळामध्ये तसंच भविष्यात आणखी कंपन्यांना कॅम्पसमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे."

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडकपूर ही एक उच्च शैक्षणिक संस्था आहे. सन 1951 मध्ये महत्त्वाची संस्था म्हणून या संस्थेचा भारतातील पहिल्या पाच संस्थांमध्ये समावेश होतो. 2019 मध्ये सरकारकडून "द इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स" या पुरस्काराने गौरवण्यात आलं. गेल्या काही वर्षांमध्ये, IIT खडकपूर जगासाठी उद्योग विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं.