नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तणाव सुरू असताना, कॅगच्या अहवालामुळे भारतासमोरचं आव्हान वाढलं आहे. कॅगने आपल्या अहवालात भारताला १० दिवस पुरेल एवढाचा दारूगोळा असल्याचं अहवालात नमूद केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-चीन यांचे संबंध अतिशय तणावपूर्ण परिस्थितीतून जात असताना, कॅगने भारतीय लष्कराकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठी असल्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.


भारताला आणखी ३० दिवस पुरेल एवढा शस्त्रसाठा आवश्यक आहे, कारण युद्धपरिस्थितीत लष्कराकडे ४० दिवस पुरेल एवढा शस्त्रसाठी अथवा युद्धसामुग्री असणे आवश्यक असते. भारतीय लष्कराकडे मात्र हा साठी १० दिवसांचा असल्याचा अहवाल कॅगने संसदेत दिला आहे.


एवढंच नाही, कॅगने निकृष्ट दर्जाची युद्धसामुग्रीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निकृष्ट शस्त्रास्त्रांमुळे शस्त्रसाठ्याला आग लागण्याच्या घटना घडत आहेत, असंही कॅगने म्हटलं आहे. कॅगने २०१५ साली देखील अपुऱ्या शस्त्रसाठ्यावर अहवाल मांडला होता.