नवी दिल्ली : चीनकडून खराब रॅपिड टेस्ट किट मिळाल्यानंतर भारताने आता दक्षिण कोरियाकडून किट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरीयाला ९.५ लाख कोविड किटची ऑर्डर देण्यात आली आहे. या कंपनीची सहायक कंपनी मानसेरमघ्ये किट बनवण्यास सुरुवात देखील झाली आहे. भारताने चीनकडून ७ लाख कोविड रॅपिड टेस्ट किट मागवले होते. या किटची गुणवत्ता खूपच सुमार होती. या किटबद्दल राज्यभरातून तक्रारी येऊ लागल्या. यानंतर चीनचे किट परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी वेळात सर्वात योग्य किंमत आणि सर्वात चांगली गुणवत्तेत हे किट घ्यायचे असल्याचे दक्षिण कोरियातील भारतीय दूतावास श्रीप्रिया रंगनाथ यांनी सांगितले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारतीय परराष्ट्र सचिव, कोरीया उप परराष्ट्र मंत्री आणि इंडो पॅसिफिक देशांतील इतर सदस्य प्रत्येक आठवड्यात नवं पाऊलं उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
भारतातील रुग्णालयांमध्ये सध्या या किटसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारताने चीनकडून पीपीई किटस आयात केली होती. पीपीई किटसची पहिली बॅच नुकतीच भारतात पोहोचली होती. मात्र, आता यापैकी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ६३ हजार किटस ठरवून दिलेल्या निकषांत बसत नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.
 
विशेष म्हणजे भारताने चीनकडून रॅपिट टेस्ट किटस आणि अन्य वैद्यकीय साधनसामुग्रीही मागवली आहे. त्यामुळे आता त्यामध्येही दोष असल्यास देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. 


कोरोनासारख्या संकटाच्या काळातही इतर देशांना सदोष वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची चीनची ही पहिली वेळी नाही. यापूर्वी चीनने स्पेनला कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारी किटस् विकली होती. मात्र, या किटसमध्ये त्रुटी असल्यामुळे स्पेनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरला होता. यानंतर स्पेनने ५० हजार दोषपूर्ण किटस् पुन्हा चीनला पाठवून दिली होती. 


नेदरलँडसला पाठवण्यात आलेली चिनी मास्कही असेच बनावट असल्याचे आढळून आले होते. संबंधित देशांनी याविषयी जाब विचारल्यानंतर चीनने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला होता.