नवी दिल्ली : युद्धाविनाच भारतीय लष्कर दरवर्षी तिनही दलाचे 1,600 जवान गमवत आहेत. वास्तविक अपघात आणि आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे ज्यामुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांची संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे.


एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अपघातात सैन्याचे 350 सैनिकांनी प्राण गमावले आहेत. ज्यामध्ये तिनही दलाचा समावेश आहे. तर 120 जवानांनी आत्महत्या केली आहे. प्रशिक्षणावेळी दुर्घटना आणि आरोग्य समस्या यामुळे देखील प्राण गमावणाऱ्यांची संख्या देखील आहे.


आकडेवारीनुसार, 2014 पासून लष्कर, नौदल आणि भारतीय वायुदलाने 6,500 जवान गमावले आहेत. वरिष्ठ अधिकारी असं म्हणतात की, जवान मानसिकरित्या त्रस्त असतात. ज्यामुळे ते आत्महत्या करतात. हे रोखण्यासाठी वगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जातो पण प्रत्यक्षात मात्र काहीच हाती लागत नाही.