भारतातील सर्वात जुनी शाळा जिथे भारतीयांना नव्हता प्रवेश, पण आज गेटबाहेर लागतात रांगा, कारण जाणून वाटेल आश्चर्य!

Indias oldest school: चेन्नईतील जॉर्ज अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक शाळा ही भारतातील सर्वात जुन्या खासगी शाळांपैकी एक आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: May 20, 2025, 07:24 PM IST
भारतातील सर्वात जुनी शाळा जिथे भारतीयांना नव्हता प्रवेश, पण आज गेटबाहेर लागतात रांगा, कारण जाणून वाटेल आश्चर्य!
सर्वात जुनी शाळा

Indias oldest school: आपल्या देशात अशा अनेक शाळा आहेत ज्या त्यांच्या शिक्षणासाठी, उत्कृष्ट सुविधांसाठी आणि महागड्या फीसाठी ओळखल्या जातात. प्रत्येकाला आपल्या शाळेचा अभिमान असतो. शाळेलादेखील आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक असतं. पण आज आपण जगातील सर्वात जुन्या शाळेबद्दल जाणून घेऊया. एक काळ असा होता जेव्हा या शाळेत भारतीयांना प्रवेश दिला जात नव्हता. पण आज हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. केवळ देशातच नव्हे तर जगभरात या शाळेची ओळख आहे. 

भारतातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा

चेन्नईतील जॉर्ज अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक शाळा ही भारतातील सर्वात जुन्या खासगी शाळांपैकी एक आहे. या शाळेची स्थापना 1715 मध्ये झाली आणि त्यावेळी ती भारतातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा होती. ज्यावेळी ही शाळा स्थापन झाली त्यावेळी भारत गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये होता. ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. या शाळेला 300 वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा आहे. आजही येथे प्रवेश मिळणे कठीण आहे आणि असंख्य विद्यार्थी येथे शिक्षण घेण्याची संधी मिळण्याची वाट पाहत असतात.

 21 एकर परिसर

भारतातील ब्रिटीश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मद्रास (आता चेन्नई) येथे देशातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा उघडली. चेन्नईतील शेणॉय नगर येथे सेंट जॉर्ज अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक शाळा अजूनही कार्यरत आहे. ही भारतातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक शाळा आहे. या शाळेचा परिसर अंदाजे 21 एकर जमिनीवर पसरलेला आहे.

नर्सरी ते बारावी पर्यंतचे चालतात वर्ग

या शाळेची संपूर्ण इमारत लाल विटांनी बनलेली आहे ज्यामुळे ती अनोख्या रंगात दिसते. येथील विद्यार्थी आणि शिक्षक या रंगाशी खूप जवळून जोडलेले आहेत. या शाळेत नर्सरी ते बारावीपर्यंतचे वर्ग चालतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीच्या काळात भारतीय मुलांना येथे शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. येथे फक्त ब्रिटीश मुलांना तसेच ईस्ट इंडिया कंपनी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्रवेश होता. चेन्नईतील सेंट जॉर्ज अँग्लो-इंडियन उच्च माध्यमिक शाळा शहरातील सर्वोत्तम शाळांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्याची फी इतर अनेक शाळांपेक्षा कमी आहे. शाळेत हॉकी टीम आहे आणि काही खेळाडू राष्ट्रीय टीमठीही खेळलेयत. येथील ग्रंथालय देखील खास आहे. कारण त्यात अजूनही 18 व्या शतकातील पुस्तके आहेत.