भीमपराक्रमासाठी भारत सज्ज! उरली 'इतकी' वर्षं; चंद्र- पृथ्वीशी थेट संबंध, 'इस्रो'नं सांगितले मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे

ISRO Mission Moon : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय घडणार? चीनमागोमाग भारत करणार जगाचे डोळे दीपवणारं काम.... इस्रोनं सविस्तर माहिती देत काय म्हटलंय पाहाच...   

सायली पाटील | Updated: Nov 17, 2025, 09:07 AM IST
भीमपराक्रमासाठी भारत सज्ज! उरली 'इतकी' वर्षं; चंद्र- पृथ्वीशी थेट संबंध, 'इस्रो'नं सांगितले मोहिमेचे महत्त्वाचे टप्पे
india on moon Mission Chandrayaan 4 Approved Launching In 2027 India Own Space Station By 2035 Isro mission latest updates

ISRO Mission Moon : (Chandrayaan 3) चांद्रयान 3 मोहिमेमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) इस्रोला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता ही संस्था नवा किर्तीमान रचण्यासाठी सज्ज झाली आहे. संपूर्ण जगाला पुन्हा एकदा अवकाश मोहिमांमध्ये असणारी आपली पकड दाखवून देण्यासाठी म्हणून ISRO पुन्हा एकदा काही नव्या मोहिमांसह सज्ज झालं आहे. त्याच धर्तीवर आगामी आर्थिक वर्षात इस्रोकडून अवकाशात 7 उपग्रहाचं प्रक्षेपण प्रस्तावित आहे. तर, 2027 मध्ये देश एक भीमपराक्रम करताना दिसेल. ज्यामुळं जगभरातील अंतराळसंशोधन संस्थांना ही भारतानं दाखवून दिलेली ताकदच ठरणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार 2027 पर्यंत भारताकडून अंतराळवीरांना अवकाशात नेणारं यान तयार केलं जाणार असून, त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी एका मुलाखखतीदरम्यान ही माहिती देत सदर संस्था अवकाशयान उत्पादन क्षमतेत तिपटीनं वाढ करणार असल्याचं स्पष्ट केलं. PTI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नारायणन यांनी इस्रोची औद्योगिक क्षमता झपाट्यानं वाढत असून, आगामी 7 प्रक्षेपणांमध्ये एक कमर्शिअल कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि अनेक पीएसएलवी (PSLV), जीएसएलवी (GSLV) मोहिमा असतील असं सांगितलं. 

भारतीय तंत्रज्ञनावरच उभी असेल संपूर्ण मोहिम... 

संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आखलेल्या आणि प्रत्यक्षात अमलात आणलेल्या अंतराळ मोहिमांमुळे जगावर छाप सोडणारा भारत 2028 पर्यंत 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या तयारीत आहे. ज्यासाठी इस्रोच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनंही मंजुरी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील काही नमुने पृथ्वीवर संशोधनासाठी आणण्यात येतील. 

२०३५ पर्यंत अवकाशात भारताचं 'स्पेस स्टेशन'

नारायणन यांच्या माहितीनुसार, 2023 पर्यंत भारत आपलं अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेनं मोठी पावलं उचलणार असून, त्यासाठीच्या कामास सुरूवातही झाली आहे. या प्रक्रियेतील पाच मॉड्यूलपैकी पहिलं मॉड्यूल 2028 मध्ये पृथ्वीकक्षेत स्थापित केलं जाईल. यामुळं भारत असं चौथं राष्ट्र ठरेल ज्याच्याकडे स्वत:चा अवकाश तळ आहे. सध्या अमेरिका, चीन, रशिया यांची अंतराळ स्थानकं असून या रांगेत आता भारताचाही समावेश असेल. 

हेसुद्धा वाचा : अमित ठाकरे संकटात! निवडणुका दृष्टीक्षेपात असतानाच मिळाला धक्का 

 

सध्याच्या घडीला जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचं योगदान 2 टक्के असून, 2030 पर्यंत ही आकडेवापी 8 टक्क्यांपपर्यंत नेण्याचा मानस इस्रों बाळगत त्या दिशेनं पावलंही उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता केंद्राचीसुद्धा मंजुरी असणाऱ्या इस्रोच्या या मोहिमांना टप्प्य़ाटप्प्यात कसं यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

FAQ

इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांनी नुकतेच काय सांगितले?
डॉ. व्ही. नारायणन (जानेवारी 2025 पासून इस्रो अध्यक्षपदावर). त्यांनी PTI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इस्रोची spacecraft उत्पादन क्षमता तिप्पट करणार आहोत आणि येत्या काळात अनेक मोहिमा येतील. 

गगनयान मोहीम (भारतीय अंतराळवीर अवकाशात) कधी होणार?
पहिला unmanned टेस्ट फ्लाइट (Gaganyaan G1) लवकरच (2025-26 मध्ये), तर पूर्ण मानवी मोहीम (भारताचे अंतराळवीर अवकाशात) 2027 मध्ये होण्याचे नियोजन आहे. यानाची मोठ्या प्रमाणात तयारी पूर्ण झाली असून, 2027 पर्यंत यान तयार होईल. 

चांद्रयान-४ मोहीम काय आहे आणि कधी आहे?
चांद्रयान-४ ही lunar sample return मोहीम आहे – चंद्रावरून माती/खडकांचे नमुने पृथ्वीवर आणणे. ही मोहीम 2028 मध्ये लाँच होईल. केंद्र सरकारने याला मंजुरी दिली असून, पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असेल. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More