Travel Interesting Facts : 'ममी' (Mummy) असं नुसतं म्हटलं तरी डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे इजिप्त. तिथं असणारे 'पिरॅमिड' त्यांचा इतिहास हा आजवर अनेकांसाठीच एक न सुटलेला गुंता आणि तितकंच मोठं रहस्य आणि अर्थातच तिथं असणाऱ्या 'ममी'. पण, भारताचंही या 'ममी'शी एक खास नातं असून, त्याच्याभोवती कैक अनुत्तरित प्रश्चांचं वर्तुळही असल्याचं म्हटलं जातं. मुळात प्राचीन काळात थडग्यांमध्ये मृत शरीर कैक पद्धतींनी जतन करणं शक्य होतं हे संशोधकांनीसुद्धा सिद्ध केलं.
दक्षिण भारतात असणाऱ्या श्री रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंग, तिरुचिरापल्ली) इथं प्रसिद्ध संत आणि धार्मिक, अध्यात्मिक गुरू रामानुजाचार्य यांचं पार्थिव आजही सुरक्षितरित्या जतन करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रामानुजाचार्य यांच्या देहाचे हे अवशेष तब्बल 900 वर्षांपूर्वीचे असल्याचं सांगण्यात येत असून हा चमत्कार पाहण्यासाठी या मंदिराला दरवर्षी अनेकजण भेट देतात.
मोक्ष मिळवण्यासाठी देहत्याग हा एकच मार्ग असल्याची शिकवण हिंदू धर्मात असल्याची अनेकाची धारणा आहे. किंबहुना त्यासाठी दाहसंस्कारही तितकाच महत्त्वाचा असल्याचं या धर्मात सांगितल्याचं अनेक धर्मगुरुंचं मत. पण, मग रामानुजाचार्यांचं पार्थिव इतकी शतकं का जतन करून ठेवण्यात आलं? हासुद्धा महत्त्वाचा प्रश्नच.
गुरु रामानुजाचार्य हे एक दार्शनिक, हिंदू धर्मशास्त्राचे जाणकार आणि समाज सुधारक असण्यासमवेत वैष्णव सांप्रदायाचे अनुयायी होते. त्यांच्या दार्शनिक विचारांनीच भक्तीमार्गाच्या आंदोलनाला अधिक प्रभावी बनवलं होतं. दक्षिण भारतातील श्री रंगनाथस्वामी मंदिरात गुरु रामानुजाचार्य यांच्या पार्थिवाला जतन करण्यासाठी चंदन, हळद आणि केशराचं मिश्रण करून त्याचा लेप लावला जातो. याशिवाय वर्षातून दोन वेळा, केसर आणि कापूर यांचं मिश्रण करून त्याचाही लेप लावला जातो. ज्यामुळं या लेपाच्या वापरानं पार्थिवाचा रंग काहीसा करडा दिसतो.

या मंदिरात आलं असता भाविकांना गुरु रामानुजाचार्य यांचं ममी स्वरुपातील जतन केलेलं पार्थिव अगदी सहजपणे पाहता येतं आणि त्याचं दर्शन घेता येतं. एका मूर्तीमागे हे पार्थिव असून, नखं आणि बोटं पाहता अनेकजण अवाक् होतात. श्री रामानुजाचार्य यांचं पार्थिव श्रीरंगम मंदिरामध्ये पाचव्या चक्रामध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवण्यात आलं आहे. मंदिरातील पुजारी म्हणतात, की हा आदेश खुद्द देव रंगनाथ यांनीच दिला होता.
कैक मान्यतांनुसार, जेव्हा गुरु रामानुजाचार्य यांनी देहत्याग करणार होते तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना याची कल्पना दिली होती. शिष्यांना आज्ञा देत आणखी फक्त तीन दिवस सोबत असल्याचं सांगितलं होतं. असं म्हणतात की गुरु रामानुजाचार्य यांनी इसवीसनपूर्व 1137 मध्ये समाधी घेतली होती.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.