महत्त्वाचे मुद्दे
Indian Army Operation Keller: (Jammu and Kashmir) जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं बैसरन व्हॅलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. ज्यानंतर दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' लाँच केलं. परिस्थिती दर दिवसागणिक चिघळत गेली. पाकिस्ताननंही भारतावर ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न केला. इथं पाकला सडेतोड उत्तर देत भारतानं अखेर शेजारी राष्ट्राला नमतं घेण्यास भाग पाडलं आणि आणखी एका मोठ्या बातमीनं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं.
भारतीय सैन्यदलानं दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आणखी एक मोठी मोहित हाती घेत कोणतीही दहशतवादी कारवाई 'अॅक्ट ऑफ वॉर' ग्राह्य धरली जाणार असल्याचं ठणावून सांगितलं आणि 'ऑपरेशन केलर' लाँच केलं.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा...
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढच्या 48 तासांमध्ये काश्मीरच्या शोपियां भागात एका चकमकीमध्ये सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाच्या ऑपरेशनल कमांडरसह 3 घातक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात दहशकवादी लपून बसल्याची माहिती मिळतात 'शोधा आणि संपवा' या त्तत्वानिशी एक मोहिम हाती घेतली. दक्षिम काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील केलर गावातील शुकरूच्या वनक्षेत्रामध्ये हे दहशतवादी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून आसरा घेत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती, जिथं त्यांचा तातडीनं शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष...
13 मे रोजी गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीनं 'सर्च एंड डिस्ट्रॉय ऑपरेशन' लाँच केलं. ज्यानंतर भारतीय सैन्यदलानं सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेचा एक फोटोसुद्धा शेअर केला. दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार सुरू झाला आणि अखेर सैन्याच्या गोळीबारानं या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला, ज्यामध्ये लष्करचा ऑपरेशनल चीफ शाहिद कुट्टेसुद्धा सहभागी असल्याचं पाहायला मिळालं. शाहिद चोटीपोरा हीरपोरा (शोपियां) येथीलच रहिवासी असल्याचं सांगण्यात येतं.
यंत्रणांकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 8 मार्च 2023 पासून तो दहशतवादी संघटनांसाठी काम करू लागला. सूत्रांच्या माहितीनुसार तो दहशतवाद्यांच्या कॅटेगरी A मधील दहशतवादी असून 8 एप्रिल 2024 ला डॅनिश रिसॉर्ट येथील गोळीबारामध्येही तो सहभागी होता. तर, 18 मे 2024 मध्ये शोपियांतील हीरपोरामध्ये भाजप सरपंचांच्या हत्येतही त्याचा सगभाग होता. अनेक दहशतवादी कारवायांशी त्याचं नाव जोडलं गेल्यामुळं त्याचा खात्मा करत या भागास सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांच्या नेटवर्कला सैन्यानं एक कठोर इशाराच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही.